भाजपचा नागपूर पदविधर मतदारसंघाचा गुंता दिल्लीत सुटणार काय ?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. ०८ नोव्हेंबर: विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदविधर मतदारसंघात आमदार प्रा. अनिल सोले व नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या तुल्यबळ उमेदवारांमुळे भाजपमधील गोंधळ दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा, विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकत्र बसून निर्णय घेणार आहेत. त्याचवेळी काँग्रेसने अॅड. अभिजित वंजारी यांना उमेदवारी दिली आहे.
नागपूर विभाग पदविधर मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबर रोजी होत आहे. हा मतदारसंघ भाजपचा प्रभुत्व असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे निवर्तमान आमदार प्रा. अनिल सोले करीत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत महापौर संदीप जोशीदेखील सक्रिय झाले आहेत. जोशी यांच्याकरिता दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या दौऱ्यानंतर महापौर जोशी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला किंमत आहे. भाजपचा उमेदवार दिल्लीतून ठरणार आहे.
काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांनी पदविधर मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. मतदारांपर्यंत माहिती पुुस्तिका पोहोचविल्या आहेत. त्यांच्याकरिता कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री थोरात आज रात्री नागपूरला पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत अभिजित वंजारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Comments are closed.