Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकनाथ खडसेंचं शक्तीप्रदर्शन किळसवाणे, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

Get real time updates directly on you device, subscribe now.

रत्नागिरी : राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर मुंबईहून जळगावसाठी रवाना झालेल्या एकनाथ खडसेंच्या दौऱ्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. शेतकरी अडचणीत असताना तुम्ही प्रवेश सोहळे, आनंद सोहळे आणि शक्तीप्रदर्शन करताय याची खंत वाटते. शेतकऱ्यांवर संकट असताना शक्तीप्रदर्शन करणे किळसवाणे आहे, असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी केला आहे. (Pravin Darekar on Eknath Khadse Road Show)

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्याचाही दरेकरांनी समाचार घेतला. पवार साहेबांचा राज्याला अनुभव आहे. ते नेहमी बोलतात त्याच्याविरोधात होतं. त्यामुळे मी कुठलीही गॅरंटी देत नाही की मंत्रिमंडळात बदल होणारच नाही,” असा टोला दरेकर यांनी पवारांना लगावला.

“राष्ट्रवादीत गेलेल्या नाथाभाऊंना आता अनुभव येईल नव्याची नवलाई आणि नवलाईचे चार दिवस असतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या आकसापोटी नाथाभाऊचा वापर राष्ट्रवादी करेल,” असा आरोपही दरेकरांनी केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“महाविकासआघाडीत स्वार्थांनी पछाडलेले मंडळी”

“महाविकासआघाडीत गावापासून ते राज्य पातळीपर्यंत खदखद आहे. सरकारमध्येच विसंवाद आहेत. सरकारमध्ये स्वार्थांनी पछाडलेले मंडळी आहेत. त्यामुळे एकाबाजूला शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात हक्कभंग आणणार आणि  दुसरीकडे मांडीला मांडी लावून सत्ता उपभोगणार ही कुठली नितिमत्ता,” असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“सुनील तटकरे यांच्या सहयोगी आमदाराला विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे होतं. तीन पक्षात महाराष्ट्रात विसंवाद आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीतील विसंवादाचा एकेदिवशी स्फोट होईल,” असं मत विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर व्यक्त केलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.