Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिने व नाट्य अभिनेत्री सही रे सही फेम गीतांजली (कामाक्षी ) लवराज कांबळी या काळाच्या पडदयाआड..

सिंधुदुर्ग: सही रे सही फेम सौ गीतांजली लवराज कांबळी यांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने पुन्हा एकदा ग्रासले होते त्याच्यावर मुंबई चर्नीरोड येथील सेफी हॉस्पिटल येथे डॉक्टर अनिल संगरिया हे ऊपचार करित होते अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आज पहाटे त्याचे मुबई येथे उपचार दरम्यान निधन झाले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील गीतांजली कांबळी या मुळ रहिवासी मात्र त्या व्यवसायाने मुबई येथे रहात असत त्याना दुर्धर केंन्सर सारख्या आजाराने ग्रासले होते त्याच्यावर उपचार चालू होते.
सही रे सही या नाटकात अभिनेते भरत जाधव बरोबर गीतांजली कांबळी यानी केलेला अभिनय आज ही प्रेक्षक विसरले नाही.झी चैनलची कुंकू मालिका ही गाजली.त्यानी बकुळा नामदेव घोटाळे, टाटा बिर्ला आणि लैला व गलगले निघाले यासिनेमामध्ये काम केल तसेच मालवणी नटसम्राट के मच्छिंद्र कांबळी यांच्या वस्त्रहरण नाटकात त्यानी केलेली कामे नाट्यरसिक दाद देत. गीतांजली यांनी अनेक 50 पेक्षा जास्त व्यावसायिक नाटकांमध्ये काम केल आहे त्याच बरोबर गीतांजली कांबळी यांचे पती लवराज कांबळी यांच्या नाटकांमध्ये त्यानी अनेक भूमिका साकारण्यात आहेत गीतांजली यांच्या जीवनावर नाटक बायको खंबीर नवरो गंभीर मालवणी नाटक निर्मित लवराज यानी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लवराज यानी मालवणी वस्त्रहरण नाटकात गोप्याची भुमिका मालवणी नटसम्राट के मच्छिंद्र कांबळी यांच्या समवेत केल्याने त्याना मालवणी वासियानी भरभरून दाद दिली याची पत्नी गिताजली यानी 2012 पासुन कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर त्यानी मात करत पुन्हा अनेक नाटक , सिनेमा व मालिकांमधून आपल्या भूमिका बजावल्या आहेत त्याच्यावर आतापर्यंत 40 केमो झाले आहेत. परंतु पुन्हा एकदा त्यांना याच आजाराने ग्रासले होते.
त्याच्या प्श्च्यात पती सिने व नाट्य अभिनेते मालवणी फेम लवराज कांबळी व त्याचा मुलगा एडिटर विराज कांबळी होत.

Comments are closed.