Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सर्वाधिक मतदानातून गडचिरोलीचा आदर्श निर्माण करा

'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' मतदान जनजागृतीचा शुभांरभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. 8 : गडचिरोली जिल्ह्यात ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवून जास्तीत जास्त मतदानासाठी प्रयत्न करत नविन विक्रम घडविण्याचे आणि मतदानाच्या बाबतीत देशभरात गडचिरोली जिल्ह्याचा आदर्श निर्माण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी आज केले.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत, मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आज गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे प्रांगणात अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाची सामुहिक शपथ देण्यात येवून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा परषिदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकसभा निवडणूकीत गडचिरोली मतदार संघातून 72 टक्के मतदान नोंदविल्या गेले आणि निवडणूका देखील शांततेत पार पडल्या याबाबत भारत निवडणूक आयोगाने गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे कौतुक केले असल्याचे जिल्हाधिकारी दैने यांनी सांगितले. शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला मतदान करण्याविषयी प्रवृत्त करावे आणि किमान 75 ते 80 टक्के मतदान होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ते म्हणाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते आकाशात मतदान जनजागृती फलकाचे फुगे सोडण्यात आले तसेच मतदार जनजागृती रथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.