Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पहिल्यांदाच आढळला O +VE बॉम्बे ब्लड गटाचा रुग्ण…

पूर्व विदर्भात पहिल्यांदाच आढळला ओ पॉझिटिव्ह बॉम्बे ब्लड रुग्ण... नांदेड येथील बॉम्बे ब्लड गटाच्या व्यक्तीने थेट दुचाकी वाहनाने गोंदिया गाठत केले गोंदियातील रुग्णाला केले रक्तदान.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
 O +VE बॉम्बे रक्त गट हे तब्ब्ल २० ते ४० लक्ष लोकात एखाद्या व्यक्तीमध्ये हा रक्त गट मिळत असून देशात या रक्तगटाचे २२० लोक आढळले आहे. तर एकट्या महाराष्ट्रात ५० च्या वर या O +VE बॉम्बे रक्त गटाच्या लोकांचा समावेश असून १९५२ साली मुबई येथील डॉ. वाय एम भेंडे यांनी या रक्त गटाचे शोध लाविले होते.

गोंदिया, दि. ५ फेब्रुवारी : पूर्व ग्रुप विदर्भाच्या गोंदिया जिल्यात पहिल्यादाच O +VE बॉम्बे रक्तगटाचा रुग्ण मिळाला असून. त्याला रक्तदान करण्यासाठी थेट नांदेड जिल्ह्याच्या इटग्याळ गावातील माधव सुवर्णकार(३६) या तरुणाने दुचाकी वाहनाने गोंदिया गाठत विनोद रामटेककर या व्यक्तीला रक्तदान करीत जीवनदान दिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

O +VE बॉम्बे रक्त गट हे अंत्यत दुर्लब आहे

गोंदियातील विनोद रामटेककर याना मूत्र पिंडाचा आजार असल्याने याना गोंदियातिल एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  मात्र  त्यांना रक्ताची गरज भासल्याने त्यांच्या रक्ताचे नमुने गोंदियातील लोकमान्य टिळक प्रयोग शाळेत पाठविले असता रिपोर्ट मध्ये विनोद यांचे रक्त गट हे O +VE बॉम्बे रक्त गट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कारण हा रक्त गट अंत्यत दुर्लब असल्याने आता हा रक्त गट मिळणार की नाही या गोष्टीचा त्याच्या नातेवाईकांच्या मनाला धक्काच बसला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्याननंतर लोकमान्य टिळक रक्तपेढीने मुबई येथील मैत्री फाउंडेशनच्या मदतीने O +VE बॉम्बे रक्त गट असलेल्या व्यक्तीचा शोध घेतला असता. नांदेड जिल्ह्यातल्या इटग्याळ गावातील माधव सुवर्णकार (३६) या तरुणाचे O +VE बॉम्बे रक्त गटाचा असल्याचे कळले.

माधव या तरुणाने रक्तदान करून विनोद रामटेककर यांचे वाचविले प्राण

माधव यांच्याशी संपर्क केला असता. माधव यांनी नांदेड ते नागपूर एका खाजगी बस ने प्रवास करीत नागपूर गाठले मात्र नागपूर ते गोंदिया दरम्यान पुढील प्रवासाकरिता वेळेवर ट्रेन किंवा बस न मिळाल्याने माधव यांनी आपल्या मित्राची साथ घेत नागपूर ते गोंदियाचा प्रवास दुचाकी वाहनाने करीत गोंदिया गाठत .गोंदियातील विनोद रामटेककर या व्यक्ती करिता वेळेवर रक्तदान करून प्राण वाचविले.त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे देखील वाचा : 

व्याघ्रदर्शनासाठी ‘ताडोबा’ हे जागतिकस्तरावरचे होणार सर्वोत्तम ठिकाण

धक्कादायक!! बांधकाम मजुराची केली हत्या अन् पोत्यात भरून फेकला मृतदेह!

धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असतानाच महिलेची प्रसूती

धक्कादायक! प्रेमविवाह करणाऱ्या तरुणावर दोघांचा चाकूने प्राणघातक हल्ला

Comments are closed.