Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असतानाच महिलेची प्रसूती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
घरकुल मिळावं या मागणीसाठी २४ जानेवारीपासून बीड तालुक्यातील वनवासवाडी येथील आप्पाराव भुजा पवार हे सर्व कुटुंबा सह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत. त्यांची पुतणी काल पहाटे मनीषा विकास काळे ही आंदोलक महिलेची प्रसूती झाली तरी देखील ही आंदोलक महिला आंदोलमावर आजूनही ठाम आहे.  24 तास उलटले तरी देखील प्रशासन अजूनही फिरकल नसल्याचा आरोप आंदोलक करत आहेत जो पर्यंत घराचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नसल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलंय आपल्या छोट्या मुलाला घेऊन ती आंदोलन स्थळी अजूनही बसण्यावर ठाम आहे त्यामुळे जन्मजात नवजात शिशुला ही जन्मापासूनच घरासाठी उपोषण करण्याची वेळ आली आहे.

बीड, दि. ४ फेब्रुवारी :  बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील दहा दिवसांपासून उपोषणासाठी बसलेल्या गर्भवती महिलेची आंदोलन स्थळीच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनीषा विकास काळे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या होत्या. गुरुवारी सकाळी पहाटेच्या सुमारास तिला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या. तिच्यासोबत कुटुंबीयदेशील होते. मात्र त्या अवस्थेतही ती आपल्या मागण्यांवर ठाम राहिली, रुग्णालयात जाण्यास नकार दिला. अखेर गुरुवारी पहाटेचार वाजता तिची प्रसूती झाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानंतरही महिला आणि तिच्या कुटुंबियांचा जिल्हाधिकारी कार्यलायसमोर ठिय्या सुरुच आहे. एवढा सगळा प्रकार होऊनही बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काहीच कार्यवाही होत नाही, हा प्रकार संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

प्रसूती महिलेचा नवजातक बालकासह उपोषण सुरूच!

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, गुरुवारी पहाटे चार वाजता मनीषा यांची प्रसूती झाली. हा प्रकार कळाल्यानंतर 8 वाजता शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पीआय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रुग्णवाहिका घेऊन गेले. त्यांनी अप्पाराव पवार यांना बाळ आणि माता यांना रुग्णालयात पाठवा असे सांगितले. मात्र अप्पाराव, मनीषा आणि तिच्या पतीने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. बाळंतीण आंदोलनस्थळीच चबुतऱ्यावर आहे. आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे देखील वाचा : 

धक्कादायक!! बांधकाम मजुराची केली हत्या अन् पोत्यात भरून फेकला मृतदेह!

व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा हे जागतिकस्तरावरचे होणार सर्वोत्तम ठिकाण

युवतीच्या गुप्तांगाचा कोरोना स्वाब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला १० वर्षाची शिक्षा

 

 

 

 

Comments are closed.