Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलीस महानिरीक्षकांनी प्राणहिता पोलीस कॅम्पला दिली भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ४ फेब्रुवारी : केंद्रीय राखीव पोलीस दल पोलीस महानिरीक्षक, पश्चिम विभाग मुख्यालय मुंबई रणदीप दत्ता (पीएमजी) यांनी ०१/०२/२२ ते ०२/०२/२०२२ या ०२ दिवसांच्या दौऱ्यात मानस रंजन, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, यांच्यासह प्राणहिता पोलिस कॅम्पमध्ये ३७  बटालियन आणि ०९ बटालियन. सी.आर.पी एफ कॅम्पला भेट देऊन क्वार्टर गार्ड येथे स्पेशल गार्डची सलामी घेतली आणि CRPF च्या ०९ आणि ३७ व्या बटालियनच्या अधिकारी आणि जवानांच्या सैनिक परिषदेला उपस्थित राहून संबोधित केले.

यावेळी त्यांनी उपस्थित सर्व अधिकारी व जवानांना प्रोत्साहन दिले, त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व नक्षलवाद ग्रस्त भागातील सर्वसामान्य जनतेचे मानवी हक्क लक्षात घेऊन नक्षलवादावर मात करण्याच्या सूचना दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी त्यांनी परिसरातील गरीब व गरजू आदिवासींना मदत करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ३७ बटालियन कॅम्पला भेट देताना रणदीप दत्ता यांनी छावणी परिसरात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वृक्षारोपण आणि जलसंचयनाचे कौतुक केले आणि मेहनती सैनिकांना बक्षीस दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सैनिक संमेलनाच्या निमित्ताने ३७ व्या बटालियनचे कमांडंट एम एच खोब्रागडे, ९ व्या बटालियनचे कमांडंट आर एस बालापूरकर, वेस्टर्न सेक्टर हेडक्वार्टर कमांडंट (इंट), जयंत कुमार, द्वितीय कमांडिंग ऑफिसर (स्टाफ) सुमित कुमार आणि दोन्ही बटालियनचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा  : 

धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असतानाच महिलेची प्रसूती

धक्कादायक!! बांधकाम मजुराची केली हत्या अन् पोत्यात भरून फेकला मृतदेह!

 

Comments are closed.