Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिला पोलिसाची आत्महत्या: कौटुंबिक त्रासाला कंटाळून घेतला टोकाचा पाऊल

कोल्हापुरातील पोलीस लाईन मधील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर, दि. १८ एप्रिल : कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल योगिनी सुकुमार पवार (वय 36, रा.पोलीस लाईन कसबा बावडा) यांनी कौटुंबिक वादातून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील पोलीस लाईनमध्ये दि. १७ एप्रिल रोजी रविवारी ही घटना घडली आहे.

घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, शाहुपूरीचे राजेश गवळी यांनी लागलीच घटनास्थळाची पाहणी केली. आत्महत्या करण्यापूर्वी योगिनी पोवार यांनी लिहिलेली चिट्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यात म्हंटले आहे. कौटुंबिक वादातून महिला कॉन्स्टेबल पोवार यांनी स्वतःची जीवन यात्रा संपवण्यासाठी टोकाचे पाऊल उचलल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी शाहूपूरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.