नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे या सध्या दोन्ही मुलांसाठी प्रचाराच्या मैदानात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून सध्या प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे सध्या निलेश राणे व नितेश राणे या दोन्ही मुलांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. असून कणकवली देवगड मतदारसंघातील वैभववाडी आणि देवगड तालुक्यात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगडमधील सभेत नीलम राणे यांनी महिलांना संबोधित करताना नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांनाही भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

मला गर्व आहे. की, कुणाचे स्वभाव बदलता येत नाहीत. मला ना नवऱ्याचा स्वभाव बदलता आला ना मुलांचा” अशी खंत माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांनी देवगडमध्ये आयोजित सभेत खंत व्यक्त केली. यावेळी सभेत नारायण राणेंच्या पत्नीच्या केलेल्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलेले आहे.
निलेश राणे, नितेश राणे निवडून आल्यानंतर जर त्यांनी काम केले नाही तर आपण त्यांना प्रत्येक कामात विचारायचं. मग ते खासदार असो किंवा दोन्हीही आमदार असो. स्वभाव मात्र कोणाचे बदलता येत नाहीत. ना नवऱ्याचा बदलता आला ना दोन्ही मुलांचा बदलता आला. त्या दोघांनीही वयाची ४० शी ओलांडली असून आता ते दोघेही शांत झाले आहेत. तुमच्या आशीर्वादाने ते तिघेही चांगलं काम करतात. तुमची काम करण्यास ते तिघेही बांधील राहतील असे नीलम राणे म्हणाल्या.
पहिल्यांदा मला दोन दोन मतदारसंघात प्रचार करावा लागतोय. प्रचाराचे शेड्युल सकाळी १० वाजल्यापासून सुरू होते आणि रात्री घरी जायला ११ वाजतात. शेतात काम आटोपून महिला सायंकाळी उशिरा येतात. त्यामुळे त्यांना भेटून घरी जाण्यास वेळ होतो. आम्हाला दोन्ही मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिथे महिला मतदार जास्त आहेत किंवा आपल्या विरोधी मते जास्त आहेत तिथे मी जाते. आम्हाला मत का द्यावं हे मी महिलांना पटवून सांगत असते. गेल्या साडे तीन वर्षात निलेशने कुडाळ मालवण मतदारसंघ पिंजून काढलाय. नितेश राणे आणि निलेश राणे हे दोघेही भरघोस मतांनी निवडून येईल असे नीलम राणे म्हणाल्या.
Comments are closed.