Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीसांची अशीही माणुसकी

वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार गावडेंनी घडवले माणुसकीचे दर्शन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पनवेल, दि. २३ मार्च :  पोलीस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे केवळ एक कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्व. मात्र या पोलिसी वर्दीमध्ये एक मायाळू आणि कनवाळू देवदूत देखील दडला असल्याचा प्रत्यय पनवेलकरांना पुन्हा एकदा आला. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन पनवेल सिग्नल पॉईंट जवळ आपले कर्तव्य निभावत असलेले पोलीस हवालदार गावडे यांना एक अपंग व्यक्ती त्यांच्या तीन चाकी सायकलवरून उड्डाणपुलावरून जात असल्याचे दिसले.

त्या अपंग व्यक्तीला नवीन पनवेल उड्डाणपुलावरील चढण पार करताना त्रास होत होता. त्या अपंग व्यक्तीची दमछाक पाहून पोलीस हवालदार गावडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता हातातील काम सोडून त्याच्या मदतीला धावून गेले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्या अपंग व्यक्तीच्या तीन चाकी सायकलला चढण पार होईपर्यंत धक्का देऊन उड्डाणपूलाच्या एका बाजूने दुसऱ्या बाजुपर्यंत जाण्यास गावडे यांनी सहाय्य केले. पोलीस हवालदार गावडे यांच्या या आदर्श कृतीमुळे नवी मुंबई पोलीस दलाबद्दल लोकांमधून अतिशय चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. वरिष्ठांनी देखील गावडे यांचे कौतुक केले आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोलीतील विशेष आहार योजनेचे यश

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.