Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दहावी-बारावी परीक्षांच्या निकाल पुन्हा शिक्षकांच्या बहिष्कारामुळे लांबणीवर?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई 23 एप्रिल : राज्यात बोर्डाच्या परीक्षा या दरवर्षीच्या तुलनेत उशिरा घेण्यात आल्यात. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या साधारतः नेहमीपेक्षा काही दिवस उशिरा सुरु झाल्या. त्यामुळे निकाल उशीर लागणार की काय अशी शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. मात्र आता शिक्षकांनी पेपर तपासण्यावरच बहिष्कार घातल्याने ही शक्यता खरी ठरणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं यंदाचं शिक्षण ऑनलाईन झालं मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. यामुळे अनेक विद्यार्थी नाराज होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात म्हणून काही विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. मात्र यानंतरही राज्यात बोर्डाच्या परीक्षा  ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्यात. आता स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. अशात हा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

शिक्षकांनी मूल्यांकनावर बहिष्कार घातल्याने राज्यातील SSC, HSC परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विनाअनुदानित शाळांच्या महाराष्ट्र बोर्डाच्या अनेक शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेवर बहिष्कार घातल्याचं समोर आलं आहे. सरकारने 100% सरकारी अनुदान देण्याची मागणी पूर्ण करावी यासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे. MSBSHSE ने उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू केली होती आणि निकाल वेळेवर घोषित करायचा होता, मात्र आता शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला आहे.

विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्या पूर्ण न झाल्यामुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका वेळेत तपासल्या न गेल्यास निकाल उशिरा लागण्याची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे. चार दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं, की दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल वेळेतच लागेल. मात्र, अशात आता हा निकाल लांबणीवर पडणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

हे देखील वाचा : 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आयुष्य समाजाच्या उध्दारा करीता समर्पीत – डाँ शिवनाथ कुंभारे

 

Comments are closed.