Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून महाविकास आघाडीचे सरकार बनलं, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे विधान.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार विश्वजित कदम हे सांगलीच्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले असून सध्या ते जोरदार प्रचार करताना दिसत आहे. सध्या राज्यात प्रचाराच्या तोफा गाजताना दिसत आहे. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडताना दिसत आहेत.

sanjat raut pCVishwajeet-Kadam

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विश्वजित कदम यांनी प्रचारसाठी सांगलीच्या पलूस – कडेगाव तालुक्यात एक सभा आयोजित केली होती. या सभेदरम्यान मतदारांना संबोधित करतेवेळी माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी महा विकासाआघाडी आणि संजय राऊत यांच्याबद्द्ल एक मजेशीर वक्तव्य केले आहे. २०१९ ला सरकार येईल असं वाटतंच नव्हतं पण  संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं, पण राऊतांच्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं” सध्या त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यातच  या  नेत्याच्या वक्तव्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेले आहे.

२०१९ ला अपवादाने महाविकास आघाडीचं सरकार बनलं. राहुल गांधी, सोनिया गांधींच्या आशीर्वादाने राज्यमंत्री झालो सहा खाती मिळाली. पण दुर्दैवाने कोरोना सुरु झाला आणी जनतेचे कामे करता आलेली नाहीत. मी विनोदाने अनेकदा म्हणतो की संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणून सरकार बनलं. पण अडचण एवढी झाली की राऊतांच्या अंगातलं कधी उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं. असे विश्वजित कदम सांगलीच्या कडेगाव तालुक्यात प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

2 लाख बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध  करून देणारी पॉस्कोन कंपनी महाराष्ट्र मध्ये येणार होती. परंतु  दिल्लीतून फोन आला आणि  महायुतीच्या नेत्यांनी ती कंपनी गुजरातला देऊन टाकली. आपला  महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही. पण या महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राला दिल्ली आणि गुजरात समोर झुकावे लागले. पण तुम्ही आमच्या पाठीशी उभे रहा, पुन्हा कधी महाराष्ट्र कुणाच्या बापाच्या समोर झुकणार नाही असेही विधान विश्वजित कदम यांनी प्रचार सभेदरम्यान केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.