Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सेक्सटॉर्षन प्रकरणात अडकवून अधिकाऱ्यांला एक कोटीची खंडणी मागणाऱ्या आरोपीला २८ लाख घेताना अटक

व्हायरल न करण्यासाठी एक कोटीची खंडणी मागितली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर  8 जुलै :-  नागपूर शहर गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने एका खंडणीखोर आरोपीला तरुणाला अटक केली आहे. अमित सोनी असे आरोपीचे नाव असून तो छत्तीसगड राज्याच्या राजनांदगावचा रहिवासी आहे. आरोपी अमित आणि त्याच्या पत्नीने नागपूरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सेक्सटॉर्षन प्रकरणात अडकवून तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.त्यापैकी खंडणीचा पहिला हफ्ता म्हणून २८ लाख घेताना नागपूर पोलिसांच्या एका पथकाने सापळा रचून आरोपी अमित सोनीला रंगेहात अटक केली आहे.

या प्रकरणातील फिर्यादीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी ते अमित सोनी आणि त्याची पत्नीला ओळखतात. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांची आरोपी अमितच्या पत्नीच्या मोबाइलवर चॅट सुरू होती. यावेळी आरोपी अमित आणि त्याच्या पत्नीने पीडित अधिकाऱ्याला अश्लील छायाचित्रे आणि मॅसेज पाठविले. त्यानंतर त्या पीडित अधिकाऱ्यालाही अशाच प्रकारची छायाचित्रे आणि चित्रफीत पाठविण्यासाठी बाध्य केलं. त्या अधिकाऱ्याने स्वतःचेचं काही अश्लील छायाचित्र आरोपीला पाठवले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

१ कोटीची केली मागणी:-

अधिकारी आपल्या जाळ्यात अडकला याची खात्री पटल्यानंतर अमितने त्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला. तुमची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफीत आमच्याकडे असून ती तुमच्या नातेवाइकांमध्ये व्हायरल करू अशी धमकी दिली. ती व्हायरल न करण्यासाठी एक कोटीची खंडणी मागितली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

१ कोटी रुपयांची एवढी मोठी रक्कम देण्यास संबंधित अधिकाऱ्याने असमर्थता दर्शविली. तेव्हा अमितने त्यानंतर अधिकाऱ्यांकडे ७० लाखांची मागणी केली. त्यापैकी पहिल्या हप्त्यात २८ लाख रुपये द्या, यावेळी तुम्हाला छायाचित्रे व चित्रफित देऊ असे अमित म्हणाला. मात्र त्याआधीच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Comments are closed.