Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सर्वसामान्यांना महागाईचा झटका,सीएनजीच्या आणि पीएनजीच्या दरात वाढ

सीएनजी आणि पीएनजी वापरकर्त्यांसाठी निराशाजनक बातमी आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 12 जुलै :-  सर्वसामांन्यांना आणखी एक झटका देणारी बातमी आहे. प्रामुख्याने सीएनजी आणि पीएनजी वापरकर्त्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महानगरकडून पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडने यासंबंधी एक पत्रक जारी केलं आहे. देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएनजीच्या किमतीत चार रुपये तर पीएनजीच्या किमतीत तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या आधी मुंबईमध्ये सीएनजीचे दर 29 एप्रिलमध्ये वाढलेले होते. त्यावेळी चार रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात  50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जाळ बसला आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पावसाळी सहलीच्या निमित्ताने हुल्लाडबाज तरुणांचा भर रस्त्यावर नागीण डान्स करून धिंगाणा… https://youtu.be/qOQkARkUndo https://youtube.com/watch?v=qOQkARkUndo&feature=share

Comments are closed.