Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मराठा आरक्षण: ९ डिसेंबरच्या सुनावणीसाठी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

राज्य सरकारच्या मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी या अर्जावर 9 डिसेंबरला दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क ५ डिसेंबर:- एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापीठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हि माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे. या समन्वय समितीमध्ये अ‍ॅड. आशिष गायकवाड, अ‍ॅड. राजेश टेकाळे, अ‍ॅड. रमेश दुबे पाटील, अ‍ॅड. अनिल गोळेगावकर आणि अ‍ॅड. अभिजीत पाटील यांचा समावेश आहे”, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“येत्या 9 डिसेंबरला होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक आणि संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा”, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

अभिजित वंजारीचा विजय म्हणजे दीक्षाभूमीचा संघभूमीवर विजय- डॉ नितीन राऊत यांची प्रतिक्रियाhttps://loksparsh.com/maharashtra/vanjaris-victory-is-deekshabhoomis-victory-over-sanghbhumi/3897/

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.