Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये दंतेवाडा येथे नक्षलवादी हल्ल्यात 11 जवान शहीद

दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या IDE भू-सुरंगस्फोटामध्ये 11 जवान शहीद झाले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 26 एप्रिल : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी लष्करी जवानांवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. बुधवारी ही घटना घडली असून, या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले. हे जवान जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) युनिटचे होते. शिवाय त्यांच्या वाहनाच्या चालकाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांची टीम पावसात अडकलेल्या सुरक्षा दलांना वाचवण्यासाठी जात होती. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटात पोलिसांचे वाहन उडवले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मिळालेल्या माहितीनुसार, दंतेवाडी जिल्ह्यातील अरनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नक्षलवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, जवानांचे एक पथक नक्षल विरोधी मोहिमेसाठी रवाना झाले होते. या मोहिमेदरम्यान अरनपूर मार्गावर IED स्फोट घडवण्यात आला. या भीषण स्फोटात 10 डीआरजी जवान आणि एका ड्रायव्हरचा मृत्यू झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी या हल्ल्यावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले- दंतेवाडा येथे सुरक्षा जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या IED हल्ल्यात 11 जवान शहीद झाल्यामुळे आम्ही दु:खी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना. नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.