Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अज्ञात इसमाचा आढळला नालीमध्ये मृतदेह..

गडचिरोली शहरातील खळबळजनक घटना..

Get real time updates directly on you device, subscribe now.

गडचिरोली 28 जुलै :- गडचिरोली शहराततून पोटेगाव मार्गा मार्गावर जिलानी बाबा दर्गाच्या बाजूला हजारे आटाचक्कीकडे जाणाऱ्या रस्त्या लगतच्या नालीमध्ये एका इसमाचा संशयास्पद मृतदेह आज 28 जुलै रोजी सकाळच्या सुमारास आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांनी मिळताच घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आहे.
शहरातील पोटेगाव मार्गावरील जिलानी बाबा दर्गाच्या बाजूने हजारे आटाचक्कीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या नालीमध्ये इसमाचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. याबाबत नागरिकांनी माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह नालीतून बाहेर काढला. मृतक इसमाची ओळख अदयाप पटलेली नसून मृतकाच्या कपाळावार धारदार शस्त्राचे वार केल्याच्या जखमा, कान कापलेले तसेच गळयात दोरीसारखा फास व कंबरेला मागच्या बाजूने मार आहे. त्यामुळे ही हत्याच असल्याचे बोलले जात आहे.

सदर इसमाची हत्या करून हत्यारांनी मृतदेह मध्यरात्रीच्या सुमारास नालीत टाकला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. मृतदेह उलटया स्थितीती ग्रीन मॅट झाकलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आला. मृतकाचे वय अंदाजे ३०-३५ वर्ष दरम्यान आहे. घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असून सीसीटीवी फुटेज मधून काही सुगावा लागतो काय याचा सुद्धा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेत इसमाची ओळख पटविण्याचे काम गडचिरोली पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा :- 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

https://www.facebook.com/107306221170364/videos/2954309904868698/?mibextid=5zaf8e

स्थलांतर रोखण्यासाठी JSW फौंडेशन आणि रोटरी क्लबचा आदर्श उपक्रम…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.