Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्थलांतर रोखण्यासाठी JSW फौंडेशन आणि रोटरी क्लबचा आदर्श उपक्रम…

दुबार शेतीसाठी बांधले पक्के सिमेंटचे बंधारे...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सुनील टोपले, जव्हार 27 जुलै :- जव्हार सारख्या दुर्गम आदिवासी नागरिकांना गावातच रोजगार मिळावा, गावातील विहिरींची पाण्याची पातळी वाढावी, आणि दुबार शेती करून स्थलांतर थांबावे या उदात्त हेतूने JSW फौंडेशन आणि रोटरी क्लब मुंबई यांनी जव्हार येथे आदर्श उपक्रम सुरू केला आहे. जव्हार मध्ये पाणलोट क्षेत्र विकास तसेच शेतीविषयक प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

JSW फौंडेशन आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून जव्हार तालुक्यात सिमेंटचे पक्के बंधारे बांधले असून, अनेक विहिरींची डागडुजी करून गाळ काढणे, शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणे अशी विकासात्मक कामं केली जात आहेत. आज JSW फौंडेशनचे संतोष महाजन आणि रोटरी क्लब मुंबईचे तुषार गांधी यांच्या टीमने या कामांची पाहणी केली असता केलेल्या कामांचा उद्देश सफल होताना दिसला. त्यामुळे अधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जव्हार तालुक्यातील ओझर गावात दोन आणि कोगदा गावात एक असे एकूण तीन सिमेंटचे पक्के बंधारे यंदा JSW फौंडेशन आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात आले आहेत. या तीनही बंधाऱ्यांमध्ये पाणी साठ्याची क्षमता एकूण 12960 क्यूबिक मीटर इतकी आहे. मंगळवारी रोटरी डिस्ट्रिक्ट मुंबईचे प्रतिनिधी श्री. तुषार गांधी व त्यांची टेक्निकल टीम यांनी काल JSW फौंडेशनच्या पाणलोट क्षेत्र विकास व शेतीविषयक उपक्रमांना भेट दिली. यावेळी सर्व बंधारे पाण्याने भरून वाहत होते. तसेच शेती विकासाची कामं देखील उत्तम सुरू असल्याने तुषार गांधी यांच्या टीम सह गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बंधाऱ्याच्या फायदा रब्बी व दुबार पिकांसाठी येथील शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच गावातही रोजगार वाढेल असा विश्वास रोटरी क्लबचे श्री. तुषार गांधी यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारची कामं जव्हार मोखाडा तालुक्यात झाली तर नागरिकांना गावातच रोजगार मिळून स्वावलंबी होतील आणि स्थलांतर रोखण्यासाठी मदत होईल असे मत JSW फौंडेशनचे संतोष महाजन यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडणीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.

 

औषधी,वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही

 

 

Comments are closed.