Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडणीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.

1 ऑगष्ट 2022 पासुन जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 27 जुलै :-  एका व्यक्तीचे कोणत्याही एकाच मतदार संघातील मतदार यादीत नाव कायम ठेवता यावे या उद्देशाने मतदारांचा आधार क्रमांक त्याच्या मतदार यादीसोबत जोडला जाणार आहे. मात्र आधार क्रमांक जोडणे ही बाब ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. यासाठी अर्ज क्रमांक 6 ब तयार करण्यात आला आहे. मतदाराचे नाव मतदार यादितील नोंदीशी आधार क्रमांक जोडल्यामुळे मतदार यादितील दुबार नोंदी कमी होणार आहेत व मतदार यादी शुध्दीकरणाच्या कामात यामुळे मदत होणार आहे. त्याअनुषंगाने दिनांक 1 ऑगष्ट 2022 पासुन जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाचा विधी व न्याय मंत्रालय यांचेव्दारा लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1650 व लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 तसेच मतदार नोंदणी अधिनियम 1960 यामध्ये सुधारणा केल्या आहेत. यामध्ये संबंधित मतदार यादी भागामध्ये बीएलओ यांच्यामार्फत घरोघरी भेटी देऊन मतदारांचा आधार क्रमांक, अर्ज क्रमांक 6 ब व्दारे जमा करण्यात येणार आहे. यासाठी विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे व त्यामधुनही अर्ज क्रमांक 6 ब गोळा करण्यात येत आहे. भारत सरकारच्या 17 जून 2022 च्या अधिसुचनेनुसार 1 एप्रील, 2023 पर्यंत किंवा त्यापुर्वी मतदार यादीत नाव असलेली प्रत्ये‍क व्यक्तीने त्याचा आधार अर्ज क्रमांक 6 ब भरून मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे ऐच्छिकरित्या जमा करावा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रत्येक मतदारांकडून आधार क्रमांक विहीत स्वरुपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलले आहे. यासाठी अर्ज क्रमांक 6 ब मतदारांना उपलब्ध् करुन देण्यात येणार आहे. तसेच अर्ज क्रमांक 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध असून मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रमांक 6 ब ERO Net, GARUDA App, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. तसेच मतदारांचा/नागरिकांचा दिलेला आधार क्रमांक गुप्त ठेवण्यात येणार आहे. तरी मतदार यादीतील नावाशी 1 ऑगष्ट 2022 पासुन मोठ्या संख्येने मतदारांनी आधार क्रमांकाची जोडणी करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक : वाघाच्या हल्ल्यात आणखी एक शेतकरी ठार…

 

Comments are closed.