Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात गत 24 तासात तीन मृत्यू, 102 नव्याने पॉझिटिव्ह ; 130 कोरोनामुक्त.

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • उपचार घेत असलेले बाधित 1,807.
  • आतापर्यंत 18,662 बाधित झाले बरे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

चंद्रपूर डेस्क 6 डिसेंबर :-चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 130 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 102 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 20 हजार 788 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 18 हजार 662 झाली आहे. सध्या एक हजार 807 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 55 हजार 685 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 32 हजार 636 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज मृत झालेल्या बाधितामध्ये चंद्रपूर शहराच्या सिव्हील लाईन मधील 73 वर्षीय पुरुष, पंचशील वार्डातील 73 वर्षीय महिला व बालाजी वार्ड येथील 76 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 319 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 296, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 102 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 35, चंद्रपूर तालुक्यातील आठ, बल्लारपुर तालुक्यातील सात, भद्रावती 10, ब्रम्हपुरी नऊ, नागभिड तीन, सिंदेवाही तीन, मुल एक, सावली दोन, राजुरा पाच, चिमुर सहा, वरोरा सात, कोरपना एक व इतर ठिकाणच्या 5 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.