Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महात्मा गांधींवर वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अकोला, दि. २८ डिसेंबर : रायपूर मध्ये झालेल्या धर्म सभेमध्ये महात्मा गांधींवर वादग्रस्त विधान करणाऱ्या अकोल्यातील  जुने शहर परिसरात राहणाऱ्या कालीचरण महाराज उर्फ अभिजित सराग याच्या विरोधात २७ डिसेंम्बरच्या रात्री उशिरा सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज याने महात्मा गांधी विरोधात वादग्रस्त विधान केले होते. अकोल्यात काँग्रेसने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा सामाजिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अकोल्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या भावसार पंच बंगल्याजवळ रहिवासी अभिजित धनंजय सराग ऊर्फ कालिचरण महाराज यांनी २६ डिसेंबर रोजी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर कालिचरण महाराजाविरुद्ध प्रशांत गावंडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम २९४ व ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काही दिवसांपूर्वी  सांगलीतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोरोना हा फर्जीवाडा आहे. जागतिक आरोग्य संघटनासुद्धा फर्जीवाडा संस्था आहे. त्यांचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे फर्जी आहेत. असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे. करोना हा भयानक महामारी नाही. ज्या करोनामुळे लोकांचा मृत्यू झाला, त्या लोकांना डॉक्टराणी मारले आहे. किडनी आणि मानवी शरीरातील अवयवांची तस्करी झालेली आहे असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला होता.

रायपुरच्या धर्मसंसदेत नेमकं काय म्हणाले कालीचरण महाराज?

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुस्लिम हे राजकारणाच्या माध्यमातून देशावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या डोळ्यासमोरच त्यांनी १९४७ मध्ये देशावर ताबा मिळवला होता. त्यांनी प्रथम इराण, इराक आणि अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तसेच राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशवरही कब्जा केला आहे. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे.
यावेळी बोलताना कालीचरण महाराज यांनी छत्तीसगडमधील काँग्रेस सरकावरही जोरदार निशाणा लगावला. धर्माची रक्षा करण्यासाठी कट्टर हिंदू नेत्यालाच सरकारचा प्रमुख करायला हवे. छत्तीसगडमधील सरकार हे पोलीस प्रशासनाचे गुलाम आहेत. त्यामुळे याठिकाणी कट्टर हिंदू नेता मुख्यमंत्री होणे गरजेचे असल्याचे कालीचरण महाराज म्हणाले. हिंदू धर्माचे रक्षण करणे हेच आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारमध्ये एक कट्टर हिंदू राजा निवडणे गरजेचे आहे.

 

हे देखील वाचा : 

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

सारंगखेडा बाजारात ६०० घोड्यांच्या विक्रीतून २ कोटीचा टप्पा पार! घोडे बाजाराचा आजचा शेवटचा दिवस

महाराष्ट्राच्या लेकीचा थेट दिल्लीला सन्मान; मिस अँड मिसेस डायडम स्पर्धेत २ पुरस्काराने सन्मानित

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.