Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सारंगखेडा बाजारात ६०० घोड्यांच्या विक्रीतून २ कोटीचा टप्पा पार! घोडे बाजाराचा आजचा शेवटचा दिवस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नंदुरबार, दि. २८ डिसेंबर : सारंगखेडा येथील घोडेबाजार ला जिल्हा प्रशासनाच्या वतीने १८ ते २८ डिसेंबर पर्यंत परवानगी दिली होती. आज घोडे बाजाराचा शेवटचा दिवस आसल्याने खरेदी विक्रीतून मोठी उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बाजारात विक्रीसाठी १५७८ घोडे दाखल झाले होते त्यापैकी ६०० घोड्यांची आता पर्यंत विक्री झाली असून त्यातून दोन कोटी ४५ लाखांची उलाढाल झाली आहे. या वर्षी घोडे बाजारात तेजी पाहण्यास मिळत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र पंधरा दिवस चालणारा घोडेबाजार १० दिवसात आवरला जाणार आसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तर यावर्षी सर्वात महाग घोडा ११ लाख रुपयाला विक्री झाला असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील बाळू मामा मंदिरासाठी खरेदी करण्यात आला आहे. एकूणच घोडे बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी असली तरी आज दिवसभर होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून घोडे बाजार तीन कोटीचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाराष्ट्राच्या लेकीचा थेट दिल्लीला सन्मान; मिस अँड मिसेस डायडम स्पर्धेत २ पुरस्काराने सन्मानित

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

राखीव वनांमध्ये असलेल्या नागरिकांचे अवैध अतिक्रमण वनविभागाने हटविले

 

 

Comments are closed.