लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अकोला, दि. २८ डिसेंबर : रायपूर मध्ये झालेल्या धर्म सभेमध्ये महात्मा गांधींवर वादग्रस्त विधान करणाऱ्या अकोल्यातील जुने शहर परिसरात राहणाऱ्या कालीचरण महाराज उर्फ अभिजित सराग याच्या विरोधात २७ डिसेंम्बरच्या रात्री उशिरा सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज याने महात्मा गांधी विरोधात वादग्रस्त विधान केले होते. अकोल्यात काँग्रेसने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरा सामाजिक तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अकोल्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या भावसार पंच बंगल्याजवळ रहिवासी अभिजित धनंजय सराग ऊर्फ कालिचरण महाराज यांनी २६ डिसेंबर रोजी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे सामाजिक भावना दुखावल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर कालिचरण महाराजाविरुद्ध प्रशांत गावंडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम २९४ व ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी सांगलीतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. कोरोना हा फर्जीवाडा आहे. जागतिक आरोग्य संघटनासुद्धा फर्जीवाडा संस्था आहे. त्यांचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे फर्जी आहेत. असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे. करोना हा भयानक महामारी नाही. ज्या करोनामुळे लोकांचा मृत्यू झाला, त्या लोकांना डॉक्टराणी मारले आहे. किडनी आणि मानवी शरीरातील अवयवांची तस्करी झालेली आहे असा धक्कादायक आरोपही त्यांनी केला होता.
रायपुरच्या धर्मसंसदेत नेमकं काय म्हणाले कालीचरण महाराज?
हे देखील वाचा :
सारंगखेडा बाजारात ६०० घोड्यांच्या विक्रीतून २ कोटीचा टप्पा पार! घोडे बाजाराचा आजचा शेवटचा दिवस
महाराष्ट्राच्या लेकीचा थेट दिल्लीला सन्मान; मिस अँड मिसेस डायडम स्पर्धेत २ पुरस्काराने सन्मानित
Comments are closed.