Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

असा मुख्यमंत्री हवा..जखमी वारकऱ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून साधला संवाद

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

सांगली प्रतिनिधी 7 जुलै :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांशी व्हिडिओ कॉल करून संवाद साधला. तुमची तब्बेत कशी आहे, तुमच्या डॉक्टरांशी माझे बोलणे झाले आहे. काळजी करू नका…लवकर बरे व्हा, सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री यांनी मिरज सर्वसामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या दिंडीतील जखमी वारकऱ्यांशी संवाद साधला.

http://https://youtube.com/watch?v=zVkAbEN6ouI&feature=share

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले होते. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी स्वतः जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा आढावा घेतला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.