Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुरडीचा विनयभंग !

विष्णुनगर पोलिसांनी आरोपीस ठोकल्या चार तासात बेड्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई डेस्क,१२ नोव्हेंबर : डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या अल्पवयीन चिमुरडीचा विनयभंग घडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरोपीने घरात कोणी नसताना पाहून चॉकलेटच अमिश दाखवत ९ वर्षीय चिमुरडीचा घरात बोलवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली.यासंबंधी विष्णुनगर पोलिसांनी आरोपीस अवघ्या चार तासात आरोपीस गजाआड केले आहे.

डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या चिमुरडीवर तिच्याच बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या व्यक्तीने चॉकलेटचे आमिष दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयन्त केला. यासंबंधी विष्णुनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गणेश वडेन यांच्या पथकांने गुप्त बातमीच्या आधारे आरोपीला चार तासात मोठा गाव खाडी येथून अटक केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच आरोपीला न्यायालयात हजर केला असता १२ नोव्हेंबर पर्यन्त पोलीस कोठडी देण्यात आली असल्याचे विष्णुनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालेराव यांच्याकडून सांगण्यात आले.

हे देखील वाचा,

प्रामाणिक करदात्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम – डॉ. भागवत कराड

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने पट्टेदार वाघाचा मृत्यू.?

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.