Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रवासात महिलांच्या दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या एका टोळीला चंद्रपुरात अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर १२ नोव्हेंबर : जिल्ह्यात बल्लारपूर पोलिसांनी बस प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने आणि पर्स लंपास करणाऱ्या एका टोळीला गजाआड केले आहे. या महिला मूळच्या नागपूर येथील रहिवासी असून जिल्हाभरात यासाठीच बसने प्रवास करत असतात आणि संधीचा फायदा घेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लंपास करतात. अशाच  प्रकारच्या घटनेचा  बल्लारपूर पोलिसांनी उलगडा केला.

लातूर येथील दयानंद उपासे हे आपल्या पत्नीसह बसप्रवास करत असतांना चंद्रपूरच्या बंगाली कैम्प येथून तेलंगणाकडे जाणाऱ्या बसमध्ये ते चढले. त्यांच्या पत्नीच्या बाजूला एक महिला बाळासह बसली व उपासे यांची पत्नी फोनवर व्यस्त असतानाची संधी साधून ही आरोपी महिलेने पर्स व त्यात असलेलं दागिन्याचा डबा लंपास करून बल्लारपूर बस  स्थानकावर उतरले. उपासे यांच्या हे लक्षात येताच त्यांनी लगेच बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तक्रारीनंतर बल्लारपूर पोलिसांनी तपास सुरु करून चंद्रपूर येथून एका महिलेला पकडले. त्या महिलेची कसून चौकशी केली असता ती महिला गुन्हा निष्पन्न करून यात चक्क सात महिलांची टोळी ताब्यात घेण्यात आली.

हे सर्व महिला नागपूर येथील असून त्यांचा घराची झाडाझडती घेतल्यावर त्या महिलांचा घरी एकूण साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्या सात महिला आरोपींना न्यायालयात सादर करून पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. यासोबतच अन्य ठिकाणच्या, याच पद्धतीने झालेल्या चोरीच्या घटना उलगडण्याची शक्यता बल्लारपूर पोलिसांनी केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे दिखील वाचा,

चॉकलेटचे आमिष दाखवत चिमुरडीचा विनयभंग !

प्रामाणिक करदात्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम – डॉ. भागवत कराड

…पुन्हा गडचिरोली विभागात एसटी चे ३४ कर्मचारी निलंबित

 

Comments are closed.