Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी पहिल्यांदाच गडचिरोलीत दाखल..

आरमोरी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारार्थ दाखल ..नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी ही इतिहासात नोंद होणार..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच आल्या. त्या आरमोरी विधानसभा क्षेत्रातील देसाईगंज (वडसा) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारार्थ आले होते. यावेळी सभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदी वर घनाघात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाच्या गोष्टी बोलतात पण त्यांनीच महाराष्ट्रातील सरकार चोरले आणि तोडल्याची टीका प्रियंका गांधी यांनी केली.

महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला गप्प बसून चालणार नाही .प्रामाणिक होण्याची जबाबदारी फक्त जनतेची आहे का? व्यासपीठावरून भाषण ठोकण्याची जबाबदारी नाही का? असा सवाल प्रियंका गांधी यांनी गडचिरोलीतील सभेत केला.सत्ताधाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. कर्नाटकात आमची सरकार आल्यानंतर आम्ही गृहलक्ष्मी योजना आणली. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना महिन्याला 3000 रुपये दिले जातील. जातीनिहाय जनगणना केली जाईल. आरक्षणाची मर्यादा वाढवणार ,25 लाखापर्यंतची आरोग्य सेवा मोफत दिली जाणार ,शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज माफ केले जाणार, तरुणांना महिन्याला 4000 रुपये भत्ता दिला जाणार असल्याची प्रियंका गांधी यांनी जाहीर सभेत सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नरेंद्र मोदी म्हणतात राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात आहेत. जवाहरलाल नेहरू आरक्षणाच्या विरोधात होतें, नेहरुंनी तर आरक्षण सुरू केले. राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा काढली. मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा केली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी जात जनगणना करणार असल्याचे सांगितले .50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार असल्याचे सांगितले. मोदीना  काय वाटते! देशाला दिसत नाही आणि तुम्ही व्यासपीठावर काही बोलाल .ज्या सरकारला राज्यातील जनतेने निवडून दिले त्याला तुम्ही पैशाच्या जोरावर हजारो कोटी रुपये देऊन सरकारची चोरी केली आणि तुम्ही संविधानाच्या गोष्टी करत आहात .तुम्ही संविधानाला वाचवणार आहात? असा परखड सवाल प्रियंका गांधी यांनी सभेत जाहीरपणे उपस्थित केला.

मी मोदींना आणि अमित शहा यांना आव्हान देते. त्यांनी व्यासपीठावर उभे राहून सांगावे की आम्ही जात जनगणना करणार ,आम्ही 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू .पण ते व्यासपीठावरून खोटे बोलतात की माझा भाऊ आरक्षणाच्या विरोधात आहे..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी प्रचार सभेदरम्यान मंचावर उपस्थित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पडोळे, विरोधी पक्ष नेते विजय वद्देटीवार, खा, नामदेव किरसान, उमदेवार रामदास मसराम, मनोहर पोरेटी तसेच अन्य महविकास आघाडीचे नेते मोठ्या प्रमाणात उपस्थिती होतें.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.