Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रफुल्ल पटेलांना ईडीचा जोरदार धक्का,सूत्रांची माहिती.

राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 21 जुलै :- : ईडीचं राज्यातील धाडसत्र कायम आहे. ईडीने आता राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिलाय. राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल  यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने पटेल यांचं मुंबईतील राहतं घर जप्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा खूप मोठा झटका आहे. प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून याआधी दोनवेळा चौकशी झाली आहे. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. दोनवेळा केलेल्या चौकशीनंतर ईडीने जो तपास केला त्यानंतर पटेल यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली.

 

Comments are closed.