Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलाने केले एका जहाल नक्षलवाद्यास अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली 24 फेब्रुवारी :- माहे फेब्रुवारी ते माहे में दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारचे सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने एका जहाल नक्षलवाद्यास दिनांक २३/०२/२०२३ रोजी अटक केले.

दिनांक २३/०२/२०२३ रोजी मिळालेल्या गोपनिय ख़बरीच्या आधारे विशेष अभियान पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षली नामे वेल्ला कैसे वेलादी, वय ३५ वर्षे, रा. येडापल्ली तह. भोपालपट्टनम्, जि. बीजापूर, (छत्तीसगड) यास अटक केली. तो सन २००१ पासुन जनमिलीशीया म्हणुन नक्षलचे काम करत होता. त्यानंतर सन २००६ पासून दिलीप आणि मंगी (सँड्रा) दलममध्ये सदस्य या पदावर कार्यरत होता. त्याचा माहे सप्टेंबर २०२१ साली मौजा मडवेली जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीमध्ये सहभाग होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच त्याचा दिनांक २३/१२/२०१२ रोजी मौजा टेकामेटा जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत सहभाग असून या चकमकीदरम्यान त्याने छत्तीसगड दलमचा डीव्हीसीएम भास्कर बास पळून जाण्यास मदत केली होती अशी माहीती चौकशी वरुन मिळाली. त्याचा जाळपोळ, चकमक, दरोडा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी गुन्ह्यामध्ये सहभाग असून, त्यास २०२१ साली मीजा मडवेली जंगल परिसरात झालेल्या चकमक या गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. त्याला मा. न्यायालयापूढे हजर केले असता, दिनांक २८/०२/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली असुन, पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे माहे- जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकूण ६५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक  नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख सा. त्यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी नक्षलवाद्यांच्या हिसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.