Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गॅस सिलेंडरचा स्पोट! मायलेकींचा होरपळून मृत्यू

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटर्वक,

यवतमाळ दि,९ मार्च : आर्णी तालुक्यातील आयता या गावातील काजल विनोद जयस्वाल आणि वैभवलक्ष्मी विनोद जयस्वाल या दोघी मायलेकींचा गॅस सिलिंडरच्या स्फोटात होरपळून मृत्यू झाला.आयता गावातील विनोद जयस्वाल यांच्या घराच्या छपराला सकाळी आठ वाजताच्या सुमारास आग लागली.

जयस्वाल यांच्या घरात असलेल्या किरकोळ विक्रीसाठीच्या पेट्रोल साठ्यामुळे ही आग भडकली असल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत घरातील गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. घरात असलेल्या आईसह पाच वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झाला. काजल विनोद जैस्वाल (वय ३०) असे आईचे तर वैभवलक्ष्मी (वय ५) असे मृत मुलीचे नाव आहे. मृत काजल ह्या गर्भवती होत्या. त्यामुळे तीन जीव या आगीने घेतले. हा स्फोट झाला त्यावेळी दोघी मायलेकीच घरी होत्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लागलेल्या आगीत या दोघींचा होरपळून मृत्यू झाला. गावकरी तसेच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तो पर्यंत दोघींचा मृत्यू झाला होता.सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा ,

 

गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेच्या प्रभाग रचनेच्या मसुद्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविल्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.