Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी तारीख द्या; राज्यपालांना दिले निवेदन – अजित पवार

१२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय लवकर घ्या; केली विनंती...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई डेस्क, दि. ४ मार्च : विधानसभा अध्यक्ष निवडीसंदर्भात आज महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवडीसाठी तारीख द्या अशा आशयाचे निवेदन दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आज दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रमाला आले असता माध्यम प्रतिनिधींनी भेटीसंदर्भात प्रश्न विचारला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मागील अधिवेशन हे फक्त पाच दिवसाचे होते. आता अर्थसंकल्प अधिवेशन २५ मार्चपर्यंत जाहीर झालेले आहे. या कालावधीत विधानसभा अध्यक्ष पद रिक्त ठेवणे योग्य नाही. त्यासाठी एक तारीख द्यावी अशी विनंती केली असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

१२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय लवकर घ्या; केली विनंती…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान याच भेटीत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न गेले वर्षभर प्रलंबित आहे तो सोडवावा याची आठवणही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करून दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

गैरवर्तनाबद्दल भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी सभागृहाने निलंबित केले होते. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सहा महिन्याच्यावर सदस्यांना निलंबित ठेवता येत नाही असा निर्णय दिला होता त्या निर्णयाचा आधार घेऊन तशापध्दतीने या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांना नियुक्त न करणे म्हणजे ज्या लोकांचे नेतृत्व ते करतात त्यांच्यावर अन्याय आहे. त्या निकालाचा आधार घेऊन हे नियुक्त प्रकरण संपवा असे राज्यपाल यांना सांगितले आहे. लोकशाही पध्दतीने ठराव करून दिलेले आहेत. नियमावलीच्या अधीन राहून १२ नावे देण्यात आलेली असल्याचेही त्यांना सांगितले. या दोन गोष्टींवर राज्यपालांनी आम्हाला वेळ दिला असेही अजित पवार म्हणाले.

हे देखील वाचा : 

लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – डी. डी. फुलझेले

ओबीसी आरक्षणावर मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला; महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.