Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतीय नारी सोनं ठेवणीच्या बाबतीत संपूर्ण जगात भारी!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सोन्याचे वर्ल्ड गोल्ड कॉउंसिलनुसार,  जगातील एकूण सोन्यापैकी विशेष म्हणजे भारतीय महिलांकडे जगातील एकूण 11 टक्के सोने आहे.

भारतात प्राचीन काळापासून सोने हे परंपरा आणि सांस्कृतिक दृष्ट्या  महत्त्वाचे प्रतीक आहे. विशेषतः स्त्रियांमध्ये, त्यांना सोन्याचे दागिने खूप आवडतात. लग्न समारंभातही सोन्याला विशेष महत्त्व आहे.  भारतीयांसाठी सोनं फक्त एक आर्थिक गुंतवणुकी नसून त्याकडे एक भावनिक गोष्ट म्हणून पाहिले जाते. लग्नसराईत तर वधूकरिता वराकडील मंडळी सोने करताना दिसतात. तसेच एखाद्या मुलाच्या बारशात देखील नातेवाईक त्यामुलासाठी सोन्याची चैन करताना दिसतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वर्ल्ड काउन्सिलच्या मते, भारतीय महिलांकडे तब्बल एकूण 24000 टन सोने आहे. हे दागिन्यांच्या रूपात जगातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी 11 टक्के आहे. यावरूनच समजते की, आपल्याकडे सोन्याची क्रेझ किती आहे.

दुसऱ्या देशांबद्दल बोलायचे झाल्यास, अमेरिकेकडे 8,000 टन, जर्मनीकडे 3,300 टन, इटलीकडे 2,450 टन, फ्रान्सकडे 2,400 टन आणि रशियाकडे 1,900 टन सोने आहे. याचा अर्थ या देशांतील सोन्याचा साठा एकत्र जरी केला तरी तो भारतीय महिलांकडे असलेल्या सोन्यापेक्षा कमी असेल .मग ते वधूचे दागिने असोत वरांचे असो. यामुळेच भारतीय महिलांकडे सोन्याचा मोठा साठा आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ऑक्सफर्ड गोल्ड ग्रुपच्या अहवालानुसार, भारतीय कुटुंबांकडे जगातील 11 टक्के सोने आहे. सोन्याच्या मालकीच्या बाबतीत दक्षिण भारतातील महिला खूप पुढे आहेत. भारताच्या एकूण सोन्यापैकी 40 टक्के सोन्याचा वाटा दक्षिणेकडील प्रदेशात आहे. यात एकट्या तामिळनाडूचा वाटा २८ टक्के आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या 2020-21 च्या अभ्यासात असेही सूचित करण्यात आले आहे की भारतीय कुटुंबांकडे 21,000 ते 23,000 टन सोने आहे. 2023 पर्यंत, हा आकडा अंदाजे 24,000 ते 25,000 टन किंवा 25 मिलियन किलोग्राम सोन्यापेक्षा जास्त झाला होता. देशाच्या संपत्तीचा हा मोठा हिस्सा आहे. हे सोन्याचे साठे भारताच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे, ज्याचा देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात 40 टक्के वाटा आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआय सातत्याने सोन्याची खरेदी करत आहे. सध्या आरबीआयच्या एकूण परकीय चलनाच्या साठ्यात सोन्याचा वाटा 10.2 टक्के झाला आहे.सेंट्रल बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील सोन्याचा साठा नोव्हेंबर अखेर 876.18 टन इतका वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण नऊ टक्क्यांनी अधिक आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी देशातील सोन्याचा साठा 803.58 टन होता.

तज्ज्ञांच्या मते, वाढत्या जिओ पॉलिटिक्स तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासारखे विकसनशील देश त्यांच्या सोन्याच्या साठ्यात सातत्याने वाढ करत आहेत. यामुळे आर्थिक संकटाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था हाताळण्यास मदत होते.

हे ही वाचा, 

 

३१ डिसेंबरला दारू पिऊ नका… !

ठाण्याचे पहिले महापौर अन् शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे दुखद निधन..

मुंबईच्या समुद्रात पुन्हा अपघात, मोठ्या जहाजाची बोटीला धडक,

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.