Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे अन्नत्याग आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

उस्मानाबाद, दि. २८ फेब्रुवारी :  खासदार छत्रपती संभाजीराजें यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे सकल मराठा समाजाने अन्नत्याग आंदोलन सूर केलं आहे. उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनीही या आंदोलनाला आपली उपस्थिती लावली.
मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे छत्रपती संभाजी राजे मुंबईच्या आजाद मैदानात आमरण उपोषणास बसले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या छत्रपती संभाजी राजेंच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलंय. सकल मराठा समाजाच्या वतीने कळंब येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आलंय. यावेळी उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनाही उपस्थिती लावली.यावेळी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार कैलास पाटील यांनी दिलंय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

 

 

Comments are closed.