Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नांदेडमध्ये नरेंद्र मोदींची जाहीर सभा, सभेतून कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेडमध्ये महायुतीची भव्य प्रचारसभा होत आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नांदेडकरांना संबोधित करत आहेत. भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी, माहूरची रेणुका देवी, मालेगावचा खंडोबा, उणकेश्वर महादेव, विष्णुपुरी काळेश्वर मंदिर यांच्या चरणी नतमस्तक होतो. स्वामी रामानंद तीर्थ स्वातंत्र्यसेनानी यांना प्रमाण करतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काँग्रेस  पक्षावर  जोरदार  हल्ला

काँग्रेसने एकापेक्षा एक घोटाळे केले. काँग्रेसने फसवणुकीत स्वतःचं रेकॉर्ड मोडलं आहे. काँग्रेसच्या लाल पुस्तकावर संविधान लिहिलं आहे, मात्र ते उघडून पाहिलं नंतर ते कोरी आहे. संविधानाच्या नावावर लाल पुस्तक छापायचं. कॉंग्रेसवाले देशात बाबासाहेबाचे नाही स्वतःच संविधान चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस वेगळी पुस्तक संविधानाचा मजाक उडवत आहे. काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची द्वेष आहे. संविधानासोबत सगळ्यात पहिला विश्वासघात काश्मीरमध्ये केला होता, असं  नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नांदेडवाशियाना  नरेंद्र मोदी यांचे आवाहन

भाजप आणि महायुतीच्या समर्थनात एक लाट सुरू आहे. आज सगळ्यांच्या तोंडात एकच नारा आहे, महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे…. लोक भाजप आणि महायुती सरकार पुन्हा पुन्हा निवडून देत आहेत. महायुतीला तिसऱ्यांदा संधी दिली आहे. नांदेडचे फुल नव्हतं यामध्ये… यावेळी नांदेडचे फुल पोहचेल का? असं म्हणत नांदेडमधून लोकसभेच्या पोट निवडणुकीत भाजप उमेदवाराला निवडून ध्यावे अशी विंनती नरेंद्र मोदींनी  नांदेडकरांना केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.