Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निर्मलाला हेल्पिंग हंड्स व मित्रांकडून मिळाला निवासाचा आधार.

ओमप्रकाश चुनारकर, लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर: मनात जिद्द जनमाणसाप्रती आपुलकी असेल तर आकाशही ठेंगणे वाटू लागते. असच काही हेल्पिंग हंड्स संस्थेकडून नाविन्य उपक्रम राबवीत असतात. राहायला घर नाही, झोपायला जागा नाही, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही अशा वेडसर लोकांप्रती असलेली आपुलकी दुभंगलेल्या नात्याला आपले नाते निर्माण करून जनमानसात आगेकुच करणारी संस्था म्हणजे मदतीचा हात देणारी हेल्पिंग हंड्स संस्था नक्षलग्रस्त दुर्गम दक्षिण भागात कार्यरत आहे. भुकेल्या आणि तहानलेल्यांना वेळेवर अन्न, पाणी, निवारा, वस्त्र देण्याचा जणू या संस्थेने विडाच उचललेला आहे. कित्येक वेडसरांना मायेचा हात पसरवीत स्वच्छ अंघोळ पाणी करून त्यांना सामान्य माणसाप्रमाणे जगता येईल असेच काही उदारमतवादी यांच्या स्वखर्चातून हेल्पिंग हंड्सचे प्रतिक मुधोळकर व त्यांची संपूर्ण चमूच्या संकल्पनेतून कित्येकांना नवीन जन्म मिळाला. जसे ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे’. ही म्हण याठिकाणी पाहायला मिळते. अशीच सत्य कहाणी आहे अहेरी येथील वेडसर निर्मलाची. 

अहेरी येथील वेडसर निर्मलाचे आधीचे घर

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निर्मला अतंत्य शांत स्वभावाची मुलगी होती घरची हलाखीची परिस्थिती असतानाही शिक्षणाची कास कधीच सोडली नाही. पुस्तक वाचणे जणू तिचा छंदच होता. पुस्तक नाही मिळाले तर तिचा जीव कासावीस व्हायचा. घरची परिस्थिती हलाखीची असली तरी शिक्षणाचे धडे घेतच होती.  जिद्द असेल तर आभाळही ठेंगणे वाटू लागत, असेच काही निर्मलाप्रती होते. वर्गातील शांत, आज्ञाकारी, हुशार अशी या मुलीची ओळख. सर्व मित्र मंडळी गुरुवर्य या सर्वांची आज्ञाकारी आवडती मुलगी होती. आजही सर्व सुख संपन्न असणाऱ्या परिवारांच्या मुलांना शाळेशिवाय विविध विषयासाठी Extra Class ची गरज असते तरी सुध्दा कुठल्याही विषयात निपुण दिसत नाही. अभ्यासक्रमातील असाच विषय म्हणजे गणित Extra Class लावूनही भल्या भल्याचे नाकी नऊ येत. मात्र त्यावेळी कठीण अवघड वाटणाऱ्या सर्व मुलांमुलींमध्ये सर्वात अव्वल गणित ह्या विषयात निपुण होती. याशिवाय वाचनाची आवड असल्याने निर्मलाने इयत्ता १० वीत शाळेतुन मुलींमधुन पहीली आली. अभ्यासाची जिद्द चिकाटी आणि दहावीत प्रावीण्याने मिळालेले गुण आणि शिक्षकांचं मार्गदर्शनामुळे ती विज्ञान विषयात प्रवेश मिळविला. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतांना निर्मला मानसीक आजाराने ग्रस्त झाली. कुटुंबातील सदस्यांनी तिच्या आजाराबद्दल मनावर घेतले नसल्याने तिच्याकडे पूर्णता दुर्लक्ष झाले. काही दिवसानंतर अचानकपणे ती गावातच दिसेनाशी झाली. घरच्यांनी शोध घेण्याच्या प्रयत्नही केला मात्र प्रयत्नही असफल झाला. कुटुंब, गावकरी, सर्वच तिला विसरून गेले. मात्र अचानकच काही वर्षांनी ती गावातच दिसली तर वेडसर अवस्थेतच !

निर्मलाची मानसिक स्थिती संतुलन ढासळल्याने तिच्यावर काही अपराध्यांनी एकटेपणाचा संधी साधून अत्याचार केला. त्यामुळे तीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर जीवाच रान केल. वेडी असली तरी कधी आपल्या डोळ्यापासून दूर होऊ दिल नाही. ‘‘जणु तिला वेडसरपनात असे कळले असावे हेच माझ सर्व जग श्रुष्टी असावी’’ अस स्पष्ट त्या गोंडस मुलाप्रती दिसत होते. पोटाची खडगी भरण्यासाठी गावात भटकंती करायची. त्यावेळी कुणी विचारही केला नसेल एका इवलुश्या तान्हुल्याला घेऊन फिरणारी निर्मला असेलच अशी साधी कल्पना कुणीही केली नाही. तान्हुल्याच्या जन्म होऊनही त्याला जवळ घेऊन बोलनारे, संस्कार देणारे कुणीच नसल्याने मायसोबत लेकरू बोट पकडून जिकडे माय जाईल तिकडे लेकरू अशी गत झाली. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

निर्मला तशी अहेरीतीलच असल्याने तिच्या आप्तपरिवार मित्र/मैत्रीणींना पाहावत नव्हतं. वेडसर असल्याने तिला काही कळत नव्हत. शेवटी तिच्या मुलगा (बालाजी) अबोला बोलायला लागला. लोकांची भाषा समजायला लागला, जीवन काय त्याला कळू लागले,  मात्र ज्या ठिकाणी त्याची राहायची झोपडी होती ती जीर्ण झालेली होती. मुलगा बालाजी याला कळू लागले मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आहे त्या जीर्ण अवस्थेतील झोपडीत राहून उदरनिर्वाह त्याच परिस्थितीत करू लागला.

निर्मलाप्रती वर्ग मित्राची असलेली आपुलकी काहीतरी चांगले करण्याची धडपड असल्याने शेवटी मदत करने गरज असल्याने हेल्पींग हँड्सची मदत घेतली. संकल्पना सांगितल्या गेली. त्यानंतर हेल्पींग हँड्सच्या मदत करणाऱ्या सर्व चमूनी कुठलाही विचार न करता मिळेल त्या ठिकाणी मदत करण्यास सुरुवात केली. आणि नागरिकांनी दिलेल्या सानुग्रही निधीतून घर बांधण्यास सुरुवात केली. देशभरात कोरोनाचे सावट असतांनाही घराचे बांधकाम पूर्ण करून छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून निर्मला व तिचा मुलगा बालाजीला घर सुपुर्द करण्यात आले. यावेळी हेल्पिंग हँड्सचा व बालाजी चा आनंद गगनात मावेनासा होत आहे. या मदतीसाठी सीआरपीएफ ३७ बटालियन अहेरी चे कमांडन्ट श्री श्रीराम मीना, सह-कमांडन्ट रामरस मीना प्रतिष्ठित नागरिक डॉ.आय.एच.हकीम व वर्गमित्र प्रतिनिधी प्रभाकर श्रीरामवार च्या हस्ते उद्घाटन पार पाडून निर्मला व तिचा मुलगा बालाजीने आज नवीन घरात प्रवेश केला. यावेळी हेल्पींग हँड्स चे कार्यकर्ते प्रतीक मुधोळकर, संतोष मद्दीवार, नितीन दोंतुलवार, शंकर मगडीवार, शैलेंद्र पटवर्धन, पूर्वा दोंतुलवार, विवेक बेझलवार, ईसताक शेख वर्गमित्र डॉ.मनीष दोंतुलवार, रमेश चुक्कावार, अनिल चिलवेलवार, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र अलोणे आदींनी निर्मलासाठी हक्काचे घर निर्माण करून मनात जिद्द जनमाणसाप्रती आपुलकी असेल तर आकाशही ठेंगणे वाटू लागते. असच काही हेल्पिंग हंड्सच्या नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आल्याने. अनाथ अबला वेड्या निर्मलाला हक्काच घर दिल्याने कौतुक होत आहे.   

Comments are closed.