Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोनं-चांदी झाले स्वस्तं, जाणून घ्या आजचे दर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क २५ नोव्हेंबर  :– देशभरात आजपासून लग्नाचा सिझन सुरु झालाय. या दरम्यान ग्लोबल मार्केटमध्ये उताराचे संकेत आणि रुपया वधारल्याने आणि चांदीच्या किंमतीत मोठा उतार झालाय. यावेळी MCX वर सोन्याची किंमत ४८ हजार ७४० रुपये प्रति ग्रॅम आहे. १५५ रुपयांनी हा वाढीव भाव आहे. सकाळी सोनं ८८ रुपयांच्या उतारासह ४८ हजार ४९७ रुपये प्रति ग्रॅम स्तरावर सुरु झालं. सुरुवातीला सोन्याने ४८ हजार ४१२ रुपये प्रति १० ग्रॅमचा न्यूनतम स्तर आणि ४८ हजार ५१६ रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चतम स्तरावर पोहोचलंय. 

कोरोना वॅक्सिन येण्याची शक्यता वाढल्याने आणि बायडेन यांनी अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभाग संभाळण्याची तयारी पाहता सोन्याच्या किंमतीत उतार पाहायला मिळेल असे एचडीएफसी सिक्योरीटीजचे ज्येष्ठ एनालिस्ट तपन पटेल यांनी म्हटलंय.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोन्याची मागणी वाढली

HDFC सिक्योरीटीजनुसार मागच्या सत्रात सोन्याचा भाव ४९ हजार ६१८ रुपये प्रति १० ग्रॅम होता. चांदी देखील १,५८८ रुपयांनी घसरुन ५९, ३०१ रुपये प्रति किलो ग्रॅमवर होती. गेल्या सत्रात ६०, ८८९ रुपये प्रति किलो ग्रॅमवर सत्र बंद झाले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चांदी दरातही घसरण 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव नुकसानासहीत १८३० रुपये प्रति सरासरी राहीला. तर चांदीची किंमत २३.४२ डॉलर प्रति सरासरी साधारण बदलली नाही.

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी १० ग्रॅम सोन्याचा दर हा १०४९ रुपये कमी झालं आहे. चांदीच्या दरात १५८८ रुपये प्रति किलोग्रॅम कमी झाला आहे. तज्ञांच म्हणणं आहे की, कोरोना व्हॅक्सीन लवकरच येण्याची चिन्ह असल्यामुळे याचा दबाव वाढला आहे.

Comments are closed.