Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था च्या वतीने शाळा, शासकीय कार्यालयांना संविधान प्रास्ताविकाची फ्रेम भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

नाशिक, दि. २९ जानेवारी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने २६ नोव्हेंबर संविधान साक्षरता अभियान पासुन विविध कार्यक्रमाचे आयोजन समतादुतांमार्फत राबवण्यात येत आहे. या अंतर्गत समतादूतामार्फत शाळा, शासकीय कार्यालये या ठिकाणी संविधान प्रास्ताविकाची फ्रेम भेट देवुन त्याचे सामुहिक वाचन करण्यात येत आहे.

प्रजासत्ताक  दिनाचे औचित्य साधून त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या समातादूत  सुजाता वाघमारे व नम्रता इंगळे यांद्वारा मध्यवर्ती कारागृह नाशिक या ठिकाणी भेट देण्यात आली .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रसंगी कारागृहाचे वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशोक कारकर व प्रशासन अधिकारी कोष्टी यांना भारतीय संविधान प्रत व संविधान प्रास्ताविकाची फ्रेम भेट देण्यात आली. तसेच कार्यक्रमाअंती बार्टी विषयक प्रकल्पाची अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी कोरोना नियमांचे पालन  करून  कार्यक्रम पार पाडण्यात आला.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

भाजपच्या माजी आमदाराची ग्रामसेवकास फोनवरून अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

अबब! जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरातच खेळला जात होता जुगार, अखेर पोलिसांची पडली धाड

अतिक्रमणावर तोडगा काढून राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे खा. अशोक नेते यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

 

Comments are closed.