Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकतर्फी प्रेमाचा किडा… युवतीवर केला चाकू हल्ला..

हल्ल्या नंतर स्वतःही गळफास लावून केली आत्महत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कोरची 4 ऑगस्ट :-  गडचिरोलीतल्या कोरची तालुक्यातील टेमली येथे एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी चाकूने प्राणघातक हल्ला करून युवकाने आत्महत्या केल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या चाकू हल्ल्यात 17 वर्षी युवती गंभीर जखमी झाली असून,सध्या ती गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तर हल्लेखोर विक्रम फुलकवर (24) याने स्वतः गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टेमली येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय बेळगाव येथे 12 वीच्या वर्गात शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास विक्रम फुलकवर याने त्याच्याकडील धारदार चाकूने सपासप 9-10 वार केले आणि पळ तेथून काढला. हा हल्ला झाला त्यावेळी मुलीची बहीण सोबत होती. तिने मध्ये पडून बहिणीला सोडविण्याचा केला. पण, तिच्यावरही चाकूने वारकरून विक्रम पसार झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विक्रमचे त्या अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते. परंतु पिडीत युवतीने त्याला नकार दिल्याने विक्रमने रागाच्या भरात तिला ठार करण्याच्या उद्देशाने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात पिडीत तरुणी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली होती. त्यावेळी मुलीच्या काकाने विक्रमच्या घरी येऊन त्याचे वडील ग्यानसिंग फुलकवर यांना विक्रमने माझ्या पुतनीवर चाकू हल्ला केल्याने ती बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचे सांगितले. दोघांचे घर शेजारी शेजारी आहेत.तेव्हा मुलाचे वडील ग्यानसिंग फुलकवर व मुलीचा काका हे तात्काळ घटनस्थळी जाऊन पिडीत मुलीला ग्रामीण रुग्णालय कोरची येथे त्याचवेळी दाखल केले.

दरम्यान, विक्रमला शोधण्यासाठी त्याचे वडील घरी जाऊन पाहतात तर विक्रम घरी नव्हता. त्याचा शोध घेण्यात आला परंतु तो कुठेही सापडला नाही. रात्र खूप झाल्याने विक्रमच्या शोध सकाळी करू असे म्हणत सर्व झोपी गेले. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळपासून त्याचा शोध सुरू केला असता, बाजूलाच घर असलेल्या कमलाबाई कलारी यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावल्याच्या स्थितीत विक्रम आढळून आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवतीची प्रकृती खालावल्याने तिला पुढील उपचारासाठी कोराची येथून गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, सदर प्रकरणाची बेळगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास प्रभारी अधिकारी अनिल नानेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कुंभारे करीत आहेत.

हे देखील वाचा :- 

संजय राऊतांच्या इडी कोठडीत ८ ऑगस्ट पर्यंत वाढ.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.