Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

 पत्नी व मुला मुलीची हत्या करून पतीनेच स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय

पतिनेच आपल्या पत्नीसह मुला,मुलीची हत्या केल्याचा पोलिसांच्या तपासात प्राथमिक अंदाज..तिरोडा तालुक्यातिल चुरडी गावातील घटना .

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 गोंदिया,दि,२१ सप्टेंबर : तिरोडा तालुक्यात येत असलेल्या चुरडी गावातील बिसेन कुटुंबातील चार लोकांचा अचानक मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली असल्याने  पोलीसाना हि घटना आव्हान देणारी होती तर दुसरीकडे सोशल मीडियात बातमी हि वार्यासारखी पसरली असल्याने  पोलिसावरही दडपण निर्माण झाले होते.

त्यामुळे सदर घटनेची सखोल चौकशी शिवाय हे कोड सुटणार नसल्याने पोलीस प्रत्येक घरातील हालचालीवर लक्ष देवून तसेच आजू बाजूच्या कुटुंबाची विचारणा केली असता पोलिसाच्या तपासात प्रथमता ५१ वर्षीय रेवचंद बिसेन या व्यक्तीनेचे आपल्या पत्नीसह मुला,मुलीची हत्या करित स्वतः देखील गळफास घेत आत्महत्या केले असावे असा संशय व्यक्त केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बिसेन कुटुंबातील मृतका मध्ये रेवचंद बिसेन (५१)  वर्षीय पत्नी मालता बिसेन (४५) मुलगी पोर्णीमा (२०) आणि मुलगा तेजस बिसेन (१७) यांचा समावेश आहे. मृतक रेवचंद बिसेन हे ट्रासपोर्ट व्यवसायिक करीत असल्याने  त्यांच्या गाडी ड्रायव्हरने आज सकाळी फोन केला असता रेवचंद यानी फोन उचलला नसल्याने ड्रायव्हर ने सकाळी घरी येवून दारातुन आवाज दिले असता दार न ऊघडल्याने ड्रायव्हरने खिडकीतुन डोकावुन पाहिले असता घरात मृतदेह पडले दिसल्याने ड्रायव्हरने याची माहिती आजूबाजूला लोकांना देत दरवाजा तोडून आत प्रवेश केला त्यावेळी घरातिल ९० वर्षीय आजी खेमनबाई हिला सोडून सर्वांची हत्या करण्यात आली असुन मृतदेह बेडवर पडलेले होते .

लगेच या घटनेची माहिती ड्रायव्हरसह गावकर्यानी तिरोडा पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटंना स्थळ गाठून मोका पंचनामा केल्या नंतर रेवचंद यानेच स्वतः आपल्या पत्नी आणि मुला मुलींची हत्या केली  असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून त्यानंतर  स्वतः घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असला तरी माध्यमाना या संदर्भात माहिती देने टाळले आहे…मात्र रेवचंद यानी आपल्या कुटुंबातील आईला वगळता इतराचीं का हत्या केली याचा शोध पोलिस घेत असल्याने तपासांती सदर प्रकरणाचे उलगडा समोर येणार आहे,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

नक्षल सदस्याला बॅनर लावतांना पोलिसांनी केली अटक 

शिक्षकानी विहरीत उडी घेऊन केली आत्महत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.