Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरची तालुक्याच्या अतिदुर्गम गुटेकसा येथील प्रा. मंगला अंताराम शेंडे ह्या बनल्या क्रीडा अधिकारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून 'क्रीडा अधिकारी' पदाला गवसणी घातली. 'ज्यूदोपटू ते क्रीडा अधिकारी' असा प्रवास

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम असलेल्या कोरची तालुक्यातील कु. मंगला अंताराम शेंडे यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते पाचवीपर्यंतचे  शासकीय आश्रमशाळा कोरची येथे झाले. त्यांना पूर्वीपासूनच खेळाची फार आवड होती.  शाळा स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेकदा नाव उज्ज्वल केले. त्यानंतर जिल्ह्यातून क्रीडा प्रबोधनी येथून अमरावती येथे ३६ मुलांची निवड झाली होती. त्यात मंगला शेंडे यांचा समावेश होता. क्रीडा प्रबोधिनीत असतानाच खेळांबाबत आकर्षण होते.

अमरावती येथील क्रीडा प्रबोधिनीत राहून नववीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्याचबरोबर ज्यूदो या क्रीडा प्रकारात प्रशिक्षण घेऊन १६ वेळा राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले. त्यात तीन सुवर्ण, दोन सिल्वर, आठ ब्राँझ पदके प्राप्त केली होती तसेच १९ वेळा राज्यस्तरावरील ज्यूदो स्पर्धेत सहभाग घेत सुवर्णपदक मिळविले. पाच वेळा उत्कृष्ट ज्यूदोपटूचा मानही मिळविला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे उच्चशिक्षणही त्यांनी क्रीडा विभागाशी संबंधित क्षेत्रातच केले.क्रीडा प्रबोधनी अमरावती येथून पुढील शिक्षण घेण्याकरिता पुणे येथील प्रबोधनीत दाखल झाल्या. तेथून दहावी ते एम. ए. (मराठी, मानसशास्त्र) बी.पी.एड्. एम.पी.एड.एम.फील केले.सध्या शारीरिक शिक्षणशास्त्रात पी.एचडी. सुरू आहे. तेथेच राहून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. विद्यार्थ्यांना ज्यूदोचे प्रशिक्षणही दिले. विशेष म्हणूजे, सन २०१२ पासून पुण्याच्या कर्वेनगरातील श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयात सहायक प्राध्यापक या पदावर आजपर्यंत काम करत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्य परीक्षेतून ‘क्रीडा अधिकारी’ बनल्या.

त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी  स्पर्धा परीक्षेचा  केलेला सतत अभ्यास व आई- वडील तसेच भाऊ डॉ. नंदकिशोर शेंडे, धनंजय शेंडे, वहिनी कौसल्या शेंडे व शिखा शेंडे. काका प्रा. श्रीराम शेंडे आदींचे मार्गदर्शन व  पाठबळामुळेच त्या  स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तालुका क्रीडा अधिकारीपदी नियुक्त होऊ शकल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे ही वाचा, 

‘पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये;

बस्तरचे वास्तव समोर आणणाऱ्या पत्रकाराला क्रूरतेनं संपवलं

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.