Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पुन्हा सेवेत रुजू; आजारपणातून बाहेर पडताच मंत्रालयात दाखल

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. 18  एप्रिल : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा मंत्रालयात कामकाजाला सुरुवात केली आहे. मंगळवार दि. 12 एप्रिल रोजी दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात 4 दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली,दोन दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेतल्यानंतर आज सोमवारपासून त्यांनी पुन्हा आपल्या कामकाजास सुरुवात केली.

श्री. मुंडे मंत्रालयात आले त्यांनी विभागाचे सचिव श्री.सुमंत भांगे, उपसचिव श्री दिनेश डिंगळे,  खाजगी सचिव डॉ. प्रशांत भामरे यांच्यासमवेत विभागाच्या विविध विषयांवर चर्चा केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मंत्रालयातील टपाल महत्त्वाच्या नस्ती यावर त्यांनी सह्या केल्या तसेच भेटावयास आलेल्या अभ्यागतांच्या भेटी घेतल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रम यशस्वीपणे पार पडावा यासाठी आजारी असताना रुग्णालयातून धनंजय मुंडेसातत्याने अधिकाऱ्यांना सूचना देत होते. कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हावे यासाठीही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून डॉक्टरांना विनंती केली होती; मात्र संबंधित डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिली नव्हती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान आज श्री. मुंडे यांनी पुन्हा कामकाजाससुरुवात केल्याने विभागातीलअधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा :

जागतिक वारसा दिनानिमित्त विशेष प्रदर्शन; मंत्रालय प्रांगणात छायाचित्र आणि चित्र प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

राज्यपालांच्या हस्ते युवा उद्योजकांना ‘महाराष्ट्र बलस्तंभ’ पुरस्कार प्रदान

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.