Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मृत्यूचा तांडव करणारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद..

भयभीत नागरिकांना वन विभागाच्या कारवाईने दिलासा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ब्रह्मपुरी 18 ऑगस्ट :-  ब्रह्मपुरी तालुक्यातील हत्तीलेंडा, सायघाटा, दुधवाही, अड्याळ या परिसरात वाघांचा वावर वाढला होता. याविषयीची बातमी कालच लोकस्पर्श न्यूज ने दिली होती . शेतशिवारांमध्ये, रस्त्यावर हे वाघ नागरिकांना दिसत होते. या वाघांनी मागील काही दिवसात बऱ्याच नागरिकांना ठार केले व काहींना जखमी केले होते . दोन दिवस आधी हत्तीलेंडा परिसरात वाघाने एका इसमाची शिकार केली व एकाला जखमी केले. यानंतर तात्काळ क्षेत्रातील लोकप्रतिनिधीनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास ही बाब आणली , वनमंत्री मुनगंटीवार यांनी निर्देश दिल्यावर या लोकप्रतिनिधीनी वनविभागाच्या कार्यालयात उपवनसंरक्षक यांची भेट घेतली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी वाघाला जेरबंद करण्याची मागणी यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी दिपेश मल्होत्रा यांनी सकारात्मक भूमिका घेतली. हा नरभक्षक वाघ १८ ऑगस्ट रोजी शेतशिवारामध्ये भ्रमण करीत असल्याचे लोकांनी पाहिले. ही माहिती मिळताच डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी(वन्यजीव)चंद्रपूर, अजय मराठे ,सशस्त्र पोलीस यांनी वाघास अचूक निशाणा साधत बेशुद्ध केले आणि पिंजऱ्यात सुखरूप बंदीस्त केले.

ही कारवाई दिपेश मल्होत्रा- उपवनसंरक्षक ब्रह्मपुरी यांचे मार्गदर्शनाखाली एम.बी.चोपडे, सहायक वनसंरक्षक ब्रह्मपुरी, आर.डी. रोडे, वनक्षेत्रपाल उत्तर ब्रह्मपुरी, राकेश आहुजा, ( बायोलॉजिस्ट ब्रह्मपुरी), वनविभागाचे क्षेत्रीय अधिकारी , कर्मचारी यांच्या पथकाने केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

कसरत करून पायपीट करत प्रशासन पोहोचले मरकटवाडीत. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.