Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Surjagad issue- जिल्हाधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणूकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या -टोप्पोच्या कुटुंबियांचा आरोप.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 10 सप्टेंबर :-  सुरजागड लोह खाणीतून पावसामुळे वाहून येणाऱ्या लाल गाळामुळे धान पिकाची संपूर्ण नुकसान झाल्याने आम्हाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी संजय मिणा आणि अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. मात्र जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी बेजबाबदार उत्तर देवून फटकारल्याने अजय टोप्पो यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा आरोप मृतकाची पत्नी उर्मीला, मुलगा रोशन, भाऊ जगतपाल आणि वडील दिलराम टोप्पो यांनी पत्रकार परिषदेत केला.

https://youtube.com/watch?v=alMWZOP7Ry8&feature=share

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

एट्टापल्ली तालुक्यातील मौजा मलमपाडी येथील उराव आदिवासी शेतकरी अजय दिलराम टोप्पो (३८) यांनी दि.३१ ऑगस्ट २०२२ रोजीच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असून त्याच्या शेतात सुरजागड लोह खाणीतून पावसामुळे वाहून येणाऱ्या लाल गाळामुळे धान पिकाची नुकसान झाल्याने मौजा मंगेर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यासह जिल्हाधिकारी संजय मिणा यांचेकडे न्याय देण्याची मागणी करुनही न्याय न देता जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी, तुम्हाला वनहक्क दावा मंजूर होऊ शकत नाही, तुम्हाला आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र देवू शकत नाही, तुम्हाला आज ना उद्या ही जमीन सोडून द्यावी लागणार आहे, जमीनीचे काहीच कागदपत्रे नसल्याने तुम्हाला नुकसान भरपाई आम्ही देऊ शकत नाही, असे उत्तर दिले. या उत्तराने दुखावलेल्या अजय टोप्पो यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. अशी माहिती नातेवाइकांची दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अजय टोप्पो यांची आत्महत्या हि जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे झालेल्या आहेत. मात्र पोलिस विभागाच्या मदतीने दबाव टाकून सदर आत्महत्या दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल हेडरी पोलिसांनी नातेवाईकांना बोलविले आणि सर्वांच्या सह्या कोऱ्या कागदावर घेतल्या, त्यावर पोलिसांनी काय लिहिले हेही आम्हाला सांगितले नाही, असे मृतकाचा भाऊ जगतपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सुरजागड लोह खाणीमुळे आज एका शेतकऱ्याने आत्महत्या करुनही जिल्हाधिकारी संजय मिणा कंपनीचे खाजगी अधिकारी असल्याच्या आविर्भावात सदर शेतकऱ्याला खोटे ठरवून पोलिसांमार्फत आत्महत्येचे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे दुर्दैवी बाब असून आदिवासी शेतकरी अजय दिलराम टोप्पो यांना न्याय मिळण्यासाठी निष्पक्षपणे चौकशी व्हावी व जिल्हाधिकारी संजय मिणा आणि इतर दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, सुरजागड पारंपारिक इलाक्याचे प्रमुख, माजी जि.प.सदस्य सैनू गोटा, ॲड.लालसू नोगोटी, मलमपाडी चे ग्रामसभा अध्यक्ष अशोक बडा, सुरजागडच्या माजी सरपंच कल्पना आलाम, मंगेश नरोटे, तुकाराम गेडाम यांनी केली आहे.

हे देखील वाचा :-

गरीब आदिवासी मुलांची वेठबिगारीसाठी मेंढपालांना विक्री प्रकरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.