Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ट्रँक्टरसह वाहुन गेलेल्या पाच जणांना गावकऱ्यांनी वाचवले

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

परभणी दी,18 ऑक्टोबर :- जिल्हात पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक नद्यां नाले दुथळून भरून वाहू लागल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला असल्याने सोनपेठ तालुक्यातील फाल्गुनी नदीला सकाळ पासुनच पुर आल्याने वाहतुक बंद होती.

सायंकाळी आठच्या सुमारास काही अतीउत्साही युवकांनी पुराच्या पाण्यात ट्रँक्टर घालण्याचा प्रयत्न केला , उपस्थितांनी त्यांना पाणी वाढल्याने धाडस न करण्याची सुचना केली , मात्र ट्रँक्टर चालकाने धाडस केले , दरम्यान काही दुरवर जाताच ट्रँक्टर मध्येच उलटून पुलाखाली गेल्याने ट्रॅक्टरवर बसलेले सर्वच पाच जण वाहुन गेले , मात्र सुदैवाने मधात झाड असल्याने झाडांचा आधार घेत आपला जीव वाचवला .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळताच घटनेच्या दिशेने धाव घेऊन मदत केली. सोबत बचाव करण्यासाठी दोरी व ट्युब असल्याने त्यांच्या सहाय्याने वाहुन गेलेल्या पाचही जणांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले .

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.