Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पालघर, दि. ५ फेब्रुवारी : वसई च्या माणिकपूर पोलिसांच्या हद्दीत २४ जानेवारीला झालेल्या लाखोंच्या घरफोडीतील दोन आरोपींना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने चेंबूर येथून अटक केले आहे. दोन्ही आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले असून पुढील तपास करत आहे.

नंदिनी गुहागरकर यांच्या आईच्या घरी २३ ते २४ जानेवारीच्या दरम्यान चोरट्याने ८ लाख ४ हजार रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. माणिकपूर पोलिसांनी २५ जानेवारीला घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण टीम आणि मध्यवर्ती टीम या दोघांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक मदतीच्या आधारे सलग चार दिवस तपास करून दोन आरोपींना अटक केली.

आरिफ शेख (२५) आणि साहिल ऊर्फ शाहबाज शेख (३६) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ६ लाख ३६ हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ वर्गवारीत महाराष्ट्राचा चित्ररथ देशात प्रथम

पहिल्यांदाच आढळला O +VE बॉम्बे ब्लड गटाचा रुग्ण…

व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा हे जागतिकस्तरावरचे होणार सर्वोत्तम ठिकाण

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.