Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचे दहा दिवसांपासून स्मशानभूमीत आंदोलन; प्रशासनाची अंत्ययात्रा काढून केला निषेध 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड, दि. ५ फेब्रुवारी : जमिनीचे क्षेत्र वाढवून मिळावे यासाठी एका शेतकऱ्याने बीडच्या लघु पाटबंधारे विभागातच स्वतःला पेटवून घेत आत्मदहन केले होते. यानंतर मयत पतीच्या निधनानंतर पत्नीला न्याय मिळावा, यासाठी शेतकऱ्याच्या विधवा पत्नीने थेट स्मशानभूमीत आंदोलनास सुरुवात केली.

आज या आंदोलनाचा दहावा दिवस, दहा दिवस उलटून देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक संघटनेने विधवा पत्नीच्या घरापासून ते स्मशानभूमी पर्यंत, प्रशासनाची प्रतीकात्मक तिरडी काढून अंत्यसंस्कार केले आहेत. पाली गावात राहणाऱ्या तारामती साळुंके यांच्या पतीने अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाला कंटाळून बीडच्या लघु पाटबंधारे विभागातच स्वतः पेटवून घेऊन आत्मदहन केले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हेही नोंद झाले. मात्र पुढे कसलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे विधवा पत्नी मागील दहा दिवसांपासून स्मशानभूमीत आंदोलन करत आहे. परंतु या दहा दिवसात एकदाही प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणी येऊन आंदोलनाची दखल घेतली नाही.

त्यामुळे सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत प्रशासनास जाग यावी, यासाठी प्रशासनाची प्रतीकात्मक तिरडी काढून स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले आहे. दरम्यान या आंदोलनस्थळी सामाजिक संघटने बरोबरच महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांनी भेट देऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा  : 

घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु असतानाच महिलेची प्रसूती

 

 

Comments are closed.