Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद विकास कामांवरून चव्हाट्यावर, उपमुख्यमंत्रीच्याच कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध

- उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्या 100 कोटीच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध. उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करनार - सचिन मुळूक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड, दि. ५ फेब्रुवारी :  बीडमध्ये विकास कामावरून शिवसेना – राष्ट्रवादीमधीक अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षांनी थेट विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून, मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी बीड मतदारसंघातील कामांना विशेष मंजुरी दिलेल्या आहेत.

मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कामांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून आडकाठी आणली जात आहे. हा प्रकार न थांबविल्यास “बीड जिल्ह्यात उदघाटन दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत. जर उदघाटन ऑनलाईन असेल तर प्रतीकात्मक पुतळा उभारून, निषेध व्यक्त करणार आहोत.” असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी दिला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाविकास आघाडी स्थापन होऊन दोन वर्षे पूर्ण झाली. राज्याच्या हिताच्या व सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी आघाडीची स्थापना करण्यात आली. विकासाला गती मिळावी म्हणून समान विकास कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. परंतु, याचा बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला विसर पडला आहे.

शिवसेनेच्या मंत्री आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीने आलेल्या विकासकामांना राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व आडकाठी आणत आहे. याबाबत वरिष्ठांना आपण कळविले आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची होत असलेली अडवणूक येत्या काळात न थांबविल्यास, बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर सोमवारी असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवनार असुन .. ऑनलाईन उदघाटन जरी असेल तरी अजित दादांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला काळे झेंडे दाखवू. असा इशारा सणसणीत इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी दिला आहे. यामुळं पुन्हा एकदा बीडमध्ये शिवसेना- राष्ट्रवादीमधील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

धक्कादायक!! बांधकाम मजुराची केली हत्या अन् पोत्यात भरून फेकला मृतदेह!

धक्कादायक! प्रेमविवाह करणाऱ्या तरुणावर दोघांचा चाकूने प्राणघातक हल्ला

खोटे लग्न लावून देऊन तरूणाची फसवणूक; पाचजणांवर गुन्हा दाखल

 

 

Comments are closed.