Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देव दर्शन घेतल्याने “त्या” गावाने संपूर्ण दलित समाजावर टाकला बहिष्कार

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील लाजीरवाणी घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

लातूर, दि. ५ फेब्रुवारी : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या ताड़मुगली गावात एका दलित तरूणाने मंदिरात जाऊन  देवाचे दर्शन घेतल्यामुळे संपूर्ण गावाने तीन दिवस दलित समाजावर बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल तीन दिवसानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने हे बहिष्काराचे प्रकरण मिटले आहे. मात्र यातून समाजात आजही जातिपातीच्या भिंती मिटत नसल्याचे चित्र उभे राहत आहे ते कसे मिटणार हाच खरा प्रश्न उद्भवत आहे.

ताडमुगळी गाव लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात असून कर्नाटक सीमावर्ती भागाच्या जवळील हे गाव आहे. तीन दिवसांपूर्वी गावातील दलित समाजातील तरुण मुलाने मंदिर प्रवेश केल्याने गावात तनावपूर्ण स्थिति निर्माण झाली होती. दलित समाजाने मंदिराच्या बाहेरुन दर्शन घ्यावे ही प्रथा गावात होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही प्रथा मोडल्यामुळे समाजात तेढ़ निर्माण झाल्यामुळे संपूर्ण गावाने तीन दिवस दलित समाजावर बहिष्कार टाकला. यात जर गावातील कोणी बहिष्काराचा नियम मोडला तर त्यास मोठी आर्थिक दंड होणार असे सांगण्यात आले. या बहिष्कारात दलित समाजाचे किराणा, दळन बंद करण्यात आले. शेतातील मजूरीसाठी बोलावने बंद करण्यात आले. यामुळे गावातील दलित समाजात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.

दोन दिवसानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचताच औराद शहाजानी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ताड़मुगली गावात पोहोचून सर्वप्रथम पोलिस बंदोबस्त लावला व सर्वाशी चर्चा करीत प्रकरण मिटवले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद विकास कामांवरून चव्हाट्यावर, उपमुख्यमंत्रीच्याच कार्यक्रमाला शिवसैनिकांचा विरोध

शेतकऱ्याच्या विधवा पत्नीचे दहा दिवसांपासून स्मशानभूमीत आंदोलन; प्रशासनाची अंत्ययात्रा काढून केला निषेध 

घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

 

 

Comments are closed.