Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून 

सिंगद येथील प्राध्यापकाच्या खुनाचा अखेर उलगडा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

यवतमाळ, दि. ५ ऑगस्ट: यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील नाल्यामध्ये पुलाच्या खाली उमरखेड येथील एका प्राध्यापकाचा मृतदेह आढळून आला होता. या खुनाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

एक ऑगस्ट रोजी दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील एका पुलाखाली अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावरून पोलिसांनी जलद गतीने तपासचक्र फिरवले असता सदर मृतदेह उमरखेड येथील प्राध्यापक सचिन देशमुख यांचा असल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन अहवालात त्याचा खुन करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहितीवरून दोन संशयतांना ताब्यात घेण्यात आले. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पत्नी वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत आहे. तर तिचा प्रियकर फॉरेस्ट गार्ड म्हणून वन विभागात कार्यरत आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल पथक करीत आहे.

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.