Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विर बलिदानी पोलीस जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘हुतात्मा स्मृती स्थळ’ कुरखेडा येथे वृक्षारोपण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कुरखेडा 6 ऑगस्ट :-  कुरखेडा (जि. गडचिरोली) येथील जांभूळखेडा-पुराडा दरम्यान येणाऱ्या ‘हुतात्मा स्मृती स्थळा’वर जनसंघर्ष समिती-नागपूर, ग्रीनर संस्था-नागपूर आणि जांभूळखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या स्थळावर १ मे २०१९ रोजी नक्षली भूसूरूंग स्फोटात गडचिरोली पोलीस दलातील १५ पोलीस आणि एक खासगी वाहन चालक, अशा १६ जणांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि भारतीय स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या स्थळावर ११६ झाडे लावण्यात आली.

विशेष म्हणजे, क्रांतिचा उद्रेक होणारा ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. याच ४ ऑगस्टला जगाला दिशा देणाऱ्या संत तुलसीदास यांची जयंती आणि भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण दिन होता. असा संयोग जुळून येत असल्याने या दिवसाचे महत्त्वही अधिक होते. या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी जांभुळखेडा ग्राम पंचायतच्या सरपंच राजबत्ती जगदीश नैताम, उपसरपंच गणपत महादेव बन्सोड, कल्पना अरविंद नंदेश्वर, मनीषा येनिदास कवरके, राधाताई श्यामराव हलामी, जांभूळखेडा वनरक्षक उत्तरा प्रभाकर मोहुर्ले, देवनाथ जयराम नैताम, कुंडलिक रतन राऊत, ग्रामसेवक ए.पी. राठौड, पोलीस पाटील हिरालाल नंदेश्वर, वरिष्ठ लिपिक धनंजय गहाणे युवा चेतना मंच चे अध्यक्ष दिलीप दिवटे, उपाध्यक्ष महेश महाडीक, ग्रीनर संस्था प्रमुख सचिन नायडू, हेमंत गूढदे, भूषण घुई, जन संघर्ष समिती चे अध्यक्ष दत्ता शिर्के, अभिषेक सावरकर, प्रवीण खापरे, ऋतीक तेल्हार, संजय गोहणे,हरिभाऊ काका आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.